मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बायकोनं ‘अशी’ पकडली नवऱ्याची Love Affairs, लंपट पतीला झाली ‘पळता भुई थोडी’

बायकोनं ‘अशी’ पकडली नवऱ्याची Love Affairs, लंपट पतीला झाली ‘पळता भुई थोडी’

आपल्यापासून सतत दूर राहणाऱ्या आणि त्याचं कारण विचारल्यानंतर चिडचिड करून मारहाण करणाऱ्या पतीच्या (Husband) चारित्र्यावर संशय आल्याने पत्नीने (Wife) एक कल्पना लढवून त्याचं पितळ उघडं पाडलं.

  • Published by:  desk news

अहमदाबाद, 14 जुलै : आपल्यापासून सतत दूर राहणाऱ्या आणि त्याचं कारण विचारल्यानंतर चिडचिड करून मारहाण करणाऱ्या पतीच्या (Husband) चारित्र्यावर संशय आल्याने पत्नीने (Wife) एक कल्पना लढवून त्याचं पितळ उघडं पाडलं. अफेअर (Extra marital affair) असणाऱ्या महिलांशी संपर्क साधत या पत्नीनं आपल्या पतीचा लंपटपणा उघडकीला (Exposed) आणला.

नेमकं काय घडलं?

अहमदाबादमध्ये  राहणाऱ्या या जोडप्याचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 8 वर्षांचा एक मुलगादेखील आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पती घरी न थांबता सतत बाहेर राहत असे. याबाबत पत्नीनं त्याला विचारणा केल्यावर रागावून तो तिला मारहाण करत असे. आपल्या पतीचे बाहेर काही प्रेमप्रकरण वगैरे सुरू असावं, अशी शंका त्याच्या पत्नीला येत होती. त्याला मोबाईलवर काही फोन आणि मेसेज आल्याचंही तिनं पाहिलं. मात्र त्या आपल्या दूरच्या बहिणी आहेत, असं सांगून तो विषय टाळत असे.

घरच्यांचा प्रतिसाद

हा प्रकार पत्नीनं सासरच्यांच्या कानावर घातला आणि पतीला याबाबत वर्तन सुधारण्याची सूचना करावी, अशी विनंती केली. मात्र सासरच्या मंडळींनी उलट पत्नीलाच शांत राहण्याचा सल्ला दिला. पतीचे बाहेर अफेअर असल्याचा संशय जेव्हा तिने घरच्यांकडे व्यक्त केला, तेव्हा तिला याबाबत ब्रदेखील न काढण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर मात्र पत्नीनं सगळी सूत्रं आपल्या हातात घेत प्रकरणाचा छडा लावण्याचा चंग बांधला.

असं फुटलं बिंग

पतीच्या मोबाईलवर सतत येणारे फोन आणि मेसेजेस पाहून ते नंबर तिनं स्वतःकडे टिपून ठेवले. यातील एकेका नंबरला फोन लावून आपल्या पतीविषयी चर्चा केली. एकूण तीन महिलांशी तिनं चर्चा केली आणि तिघींसोबतही तिच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचं तिला समजलं. आपण विवाहित असल्याची बाब या पतीने तिन्ही महिलांपासून लपवून ठेवली होती. जेव्हा महिलांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा चौघींनी मिळून एक योजना आखली.

हे वाचा - विवाहबाह्य संबंधामुळे महिलेला गावकऱ्यांसमोर दिली ही शिक्षा; भयानक व्हिडीओ VIRAL

पळता भुई थोडी

पत्नी आणि तीन महिला अशा चौघी एकत्रितपणे पतीच्या समोर हजर झाल्या. चौघींना एकत्र पाहून पतीची पाचावर धारण बसली. काय बोलावं त्याला कळेना, घाम फुटला आणि तोंडातून शब्दही फुटेना. आपली चोरी पकडली गेली असून आता कुठल्याच स्पष्टीकरणाने आपण वाचू शकत नाही, याची जाणीव त्याला झाली आणि त्याने आपली चूक कबूल केली.

First published:

Tags: Crime, Wife and husband, Women extramarital affair