पिंपरी चिंचवड, 21 जुलै : पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरात (Chakan MIDC area) एका ATM सेंटरमध्ये अचानक स्फोट (Explosion in Chakan ATM Center) झाल्याची माहिती समोर येत आहे. एटीएम सेंटरमध्ये झालेल्या या स्फोटामुले परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चाकण MIDC परिसरातील आंबेठान गावाजवळील (Aambethan Village) भांबोली फाट्यावर असलेल्या हिताची बँकेच्या ATM सेंटरमध्ये (Hitachi ATM Center) हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हा स्फोट नेमका कसला आहे आणि कशामुळे झाला आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, ATM सेंटरचे दरवाजे दूर फेकले गेले आणि ATM मशीन ही जळाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र या विचित्र घटनेनं सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं आहे. विशिष्ट प्रकारच्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज पोलिसांनकडून वर्तवला जात आहे. या स्फोटामध्ये एटीएम ATM मशिनचा अर्धा भाग फुटला असून, सुमारे 6 ते 7 लाख रुपये रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.
नाशकात मित्राकडूनच घात, अल्पवयीन मुलीला फिरायला नेलं अन् गुंगीचं औषध देत अत्याचार
दरम्यान हा स्फोट चोरीच्या उद्देशाने केला गेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि स्फोटाच नेमकं कारण शोधण्यासाठी श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.