नाशिक, 21 जुलै: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर याठिकाणी फिरायला जाण्याचा बहाणा करत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडितेला एका लॉजवर नेऊन शीतपेयातून गुंगीचं औषध देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल (FIR lodged) करण्यात आली आहे. पोलिसांनी बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचा (POCSO) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक (Arrest) केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
रोहित आनंद म्हसदे असं अटक केलेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून ते पंचवटी येथील फुलेनगर परिसरातील रहिवासी आहे. आरोपीनं आपल्यासोबत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्र्यंबकेश्वर याठिकाणी फिरायला नेलं. येथे गेल्यानंतर आरोपीनं तिला हॉटेल वजा लॉजमध्ये थांबवून पीडितेला गुंगीचं औषध दिलं. यानंतर आरोपीनं पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत विकृत कृत्य; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्..
खरंतर, सध्या नाशकात लॉकडाऊनची कडक अमलबजावणी केली जात आहे. त्र्यंबकेश्वर या पर्यटनस्थळी जाण्यास पोलिसांनी नागरिकांना मज्जाव केला आहे. असं असूनही आरोपीनं पंचवटी येथून पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर घेऊन गेला आहे. पोलिसांची नजर चुकवून आरोपीनं तिला त्र्यंबकेश्वरला नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी आणि आरोपी हा एकाच ठिकाणी कामाला असल्याची माहितीही समोर आली आहे. एकत्र काम करत असल्यानं त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. पण आरोपीनं मैत्रीत घात करत हे विकृत कृत्य केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik, Rape on minor