मराठी बातम्या /बातम्या /पुणे /एकतर्फी प्रेमातून भेट दिला महागडा फोन; जाब विचारायला गेलेल्या तरुणीच्या नातेवाईकांवर गोळीबार

एकतर्फी प्रेमातून भेट दिला महागडा फोन; जाब विचारायला गेलेल्या तरुणीच्या नातेवाईकांवर गोळीबार

(File Photo)

(File Photo)

Crime in Pune: पुण्यात एकतर्फी प्रेमातून (One sided love) एका तरुणाने तुफान राडा घातला आहे. जाब विचारायला गेलेल्या पीडितेच्या नातेवाईकांवर त्यानं गावठी बंदुकीतून गोळीबार (Firing at victim relative) केला आहे.

पुणे, 28 मे: एकतर्फी प्रेमातून (One sided love) त्रास देणाऱ्या तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना संबंधित तरुणाने पीडित तरुणीच्या नातेवाईकांवर गावठी बंदुकीतून गोळीबार (Firing at victim relative) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. याप्रकरणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक (one sided lover arrest) केली आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित अटक केलेल्या तरुणाचं नाव अक्षय ऊर्फ रावण चंद्रकात दुबे असून तो पुण्यातील कोल्हेवाडी परिसरातील रहिवासी आहे. तो मागील काही काळापासून एका तरुणीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. दरम्यान त्याने बुधवारी संबंधित महिलेसाठी तिच्या घरी एक महागडा फोन आणि काही खाद्यपदार्थ भेट म्हणून पाठवले होते. याची माहिती पीडितेच्या घरच्यांना समजली. त्यामुळे पीडितेच्या घरचे आरोपीला जाब विचारण्यासाठी किरकटवाडी येथील एका हॉटेल परिसरात गेले.

यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी अक्षयला मोबाईल फोन आणि खाद्यपदार्थ पाठवल्याबाबत जाब विचारला. यातून त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्यानंतर अक्षयने पीडितेच्या नातेवाईकांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. बाचाबाची झाल्यानंतर नातेवाईक आरोपी अक्षयला पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. दरम्यान संतापलेल्या अक्षयने तरुणीच्या नातेवाईकांवर गावठी बंदुकीतून गोळीबार केला.

हे ही वाचा-अल्पवयीन मुलाकडून मित्राची निर्घृण हत्या, शवविच्छेदन रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाहीत. गोळीबारानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात अक्षय ऊर्फ रावण चंद्रकात दुबे या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास हवेली पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gun firing, Pune