मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अल्पवयीन मुलानं केली मित्राची निर्घृण हत्या, शवविच्छेदन रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

अल्पवयीन मुलानं केली मित्राची निर्घृण हत्या, शवविच्छेदन रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एका अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या (Minor Died After Stabbed by Knife) करण्यात आली आहे. यात आणखी एक हैराण करणारी गोष्ट म्हणजे या घटनेतील हत्या (Murder) करणारा आरोपीदेखील अल्पवयीन (Minor) आहे.

वॉशिंग्टन 28 मे : एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या (Minor Died After Stabbed by Knife) करण्यात आली आहे. यात आणखी एक हैराण करणारी गोष्ट म्हणजे या घटनेतील हत्या (Murder) करणारा आरोपीदेखील अल्पवयीन (Minor) आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरण अमेरिकेच्या फ्लोरिडीमधील (Florida) आहे.

फॉक्स ३० मध्ये आलेल्या वृत्तानुसार, ट्रिस्टिन बॅलीच्या हत्येनंतर पोलिसांनी एडनला अटक केली आहे. एडनवर आरोप आहे, की त्यानं ट्रिस्टिनवर चाकूनं 114 वेळा वार केले आहेत. यामुळेच ट्रिस्टिनचा मृत्यू झाला आहे.

न्यायालयात सुनावणीदरम्यान वकीलांनी असं सांगितलं, की ट्रिस्टिन आणि एडन यांच्यात लहान मुलांमध्ये होणारी भांडणं सुरू झाली. मात्र, त्याचा शेवट अत्यंत भयानक झाला. ही हत्या इतकी निर्घृण होती की एडनला अल्पवयीन असूनही शिक्षेत कोणतीही सूट मिळणार नाही.

शवविच्छेदन अहवालात असं समोर आलं, की ट्रिस्टिनच्या शरीरावर 114 वार होते. हे सर्व चाकूनं वार केलेले होते. यातील 49 वार ट्रिस्टिनच्या हातावर आणि डोक्यावर होते. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हत्येत वापरण्यात आलेला चाकूही ताब्यात घेण्यात आला आहे. चाकुचा पुढील टोकदार भाग कापला गेला आहे. हा भाग शवविच्छेदनादरम्यान ट्रिस्टिनच्या शरीरात आढळला आहे. याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा दिली जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder news