पुणे, 9 सप्टेंबर : पुण्यासह (Pune) राज्यभर उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. अजूनही पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरुवात होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मानाचे गणपती मंडळानी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना उद्या दुपारपर्यंत होणार आहे. कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका निघणार नाहीत. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता येणार आहे.
पाहुयात पाच मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना कशी होणार आहे....
कसबा गणपती मानाचा पहिला गणपती
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी होणार आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात येईल मंडळाच्या फेसबुक पेजवर दर्शन आणि लाईव्ह कार्यक्रम पाहता येणार आहे...
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते आणि सनई-चौघडा च्या सुरावटीत होणार आहे. फेसबुक फेजवरून भक्तांना दर्शन घेता येणार आहे.
हे ही वाचा-मंदिरातून आणलेली फुलं सुकल्यानंतर काय करावं? एकदा वाचाच
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम
गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता केली जाणार आहे.यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.उत्सव मूर्तीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मंडळाच्या फेसबुक पेजवर याचेही दर्शन होणार आहे...
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. मंदिराभोवती घंटी महालाची आकर्षण सजावट सरपाले बंधूनी साकारली आहे. गणेश याग मंत्रजागर असे धार्मिक विधी होणार आहेत. गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा ऑनलाइन पाहता येणार आहे. मंडळाच्या यूट्यूब पेजवर दर्शनाचीही सोय करण्यात आली आहे.
हे ही वाचा-फक्त गणेश चतुर्थीलाच गणपतीला वाहतात तुळस; यामागचं कारण माहीत आहे का?
मानाचा पाचवा केसरीवाडा
केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने परंपरेनुसार पालखीतून केसरीवाड्यात मूर्ती आणली जाईल. केसरी चे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी होणार आहेत.बाप्पा थाटात विराजमान होणार आहेत.उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
http//:youtube.com
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी १० वाजून २३ मिनिटांच्या मुहूर्तावर अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक आरास करण्यात येईल. ऋषीपंचमीचा ११ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
www.dagdushethganpati.com
भारतातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊ रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम।मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी।यांच्या हस्ते दुपारी 12.30वाजता होईल
गणेशोत्सवानिमित्त ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव होणार आहे
www. bhavurangari.com या संकेस्थळावर ऑनलाईन दर्शन घेता येईल आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येतील
अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा ima चे माजी अध्यक्ष dr अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता होईल. परंपरेनुसार सनई चौघडा वादन होणार आहे.
http://akhilmandaimandal. org/ या वेबसाईटवर दर्शन घेता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dagaduseth halwai ganpati temple, Ganesh chaturthi, Pune