• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'कोरोना लशीच्या दरातील तफावत दूर करा, अन्यथा...'; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

'कोरोना लशीच्या दरातील तफावत दूर करा, अन्यथा...'; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

भारतात तयार झालेल्या कोरोना लशी या परदेशात साधारणपणे 3.25 ते 5.25 प्रती डॉलर या दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण भारतात हीच लस 1200 रूपये प्रति डोस म्हणजेच 16 डॉलर प्रति डोस इतक्या चढ्या भावाने कशी काय विकली जाऊ शकते?

  • Share this:
पुणे, 26 एप्रिल : कोरोना लशींच्या दरांमधली तफावत केंद्र सरकारने तत्काळ दूर करून सर्वांना दीडशे रूपयात लस उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेन, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसंच स्वदेशात विकल्या जाणाऱ्या लशींची किंमत ही निर्यात मुल्यापेक्षा जास्त कशी असू शकते, असा खडा सवालही प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. भारतात तयार झालेल्या कोरोना लशी या परदेशात साधारणपणे 3.25 ते 5.25 प्रती डॉलर या दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण भारतात हीच लस 1200 रूपये प्रति डोस म्हणजेच 16 डॉलर प्रति डोस इतक्या चढ्या भावाने कशी काय विकली जाऊ शकते? असा कळीचा प्रश्नच प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकार आणि लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना केला आहे. लशीच्या दरातील ही तफावत म्हणजे भारतीयांची आर्थिक लूट असून ती केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तत्काळ थांबवली नाही तर वंचित बहुजन आघाडी याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेन, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिला आहे. दरम्यान, 18 ते 45 या वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने आता राज्य सरकारांवर ढकलल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विदेशातल्या लसी खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची घोषणा केली. पण राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर हे असं लस खरेदीचं ग्लोबल टेंडर काढण्याचा अधिकारच नसल्याचा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही आंबेडकरांनी केली आहे. ही लाट आटोक्यात आणायची असेल तर सरकारने खासगी हॉस्पिटलचे बेड, हॉस्टेल ताब्यात घ्यावेत. जिथे दोन्ही नसेल तिथे प्रायव्हेट हॉटेल आणि हॉस्पिटल ताब्यात घ्यावेत, असा सल्ला दिला आहे. राज्यात होम क्वारंटाइनमुळेच रुग्ण संख्या वाढत असल्याचं निरीक्षण प्रकाश आंबेडकर यांनी नोंदवलं आहे. हे ही वाचा-कोरोना काळात 196 कोटी रुपयांचा खासदार निधी वापराविना पडूनच आपल्याकडे अजून तरी प्रत्येकाला स्वतंत्र खोली नाही. त्यामुळेच संस्थात्मक क्वारंटाईनचा पर्याय सरकारने उपलब्ध करून द्यावा, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले. पीएम केअर निधीमध्ये किती रक्कम जमा झाली याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले," माझ्या माहिती प्रमाणे 1000 कोटींपेक्षा अधिक पैसे पीएम केअरमध्ये आले आहेत. कालच पंतप्रधान मोदी यांनी या निधीचा वापर करू सांगितले आहे. त्यावर भाजपवाले त्यांची पाठ थोपटून घेत आहेत. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, पंतप्रधानांचे प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणे होते. शहा आणि मोदी यांनी मिळून 294 सभा घेतल्या होत्या. कोविड वाढताना मोदी निरोसारखं वागत होते. रोम जळताना निरो व्हायोलिन वाजवत होता तसे यांचे लक्ष बंगालवर होते. यावर आम्ही अपेक्षा करतोय तृणमुल काँग्रेसने तिथे पुन्हा सरकार स्थापन करावं."
Published by:Meenal Gangurde
First published: