Home /News /coronavirus-latest-news /

कोरोना काळात 196 कोटी रुपयांचा खासदार निधी वापराविना पडूनच

कोरोना काळात 196 कोटी रुपयांचा खासदार निधी वापराविना पडूनच

एकीकडे वैद्यकीय पायाभूत सुविधा उभा करायला पैसे नसल्याची कारणे दिली जातात, मात्र त्याच वेळेस राज्यातल्या 49 खासदारांचे तब्बल 196 कोटी रुपये वापराविना पडून आहेत.

मुंबई, 26 एप्रिल : राज्यात कोणाची परिस्थिती गंभीर होत असताना ग्रामीण भागातील स्थिती पूर्णतः हाताबाहेर गेली आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या नावाने राज्यभर मोठी वानवा आहे. एकीकडे वैद्यकीय पायाभूत सुविधा उभा करायला पैसे नसल्याची कारणे दिली जातात, मात्र त्याच वेळेस राज्यातल्या 49 खासदारांचे तब्बल 196 कोटी रुपये वापराविना पडून आहेत. यात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे. मात्र केंद्राकडून हा निधी देण्यात आलेला नाही असे स्पष्टीकरण काही खासदारांनी दिलं आहे. राज्यभरात प्रत्येक शहरात गावात कोणाच्या रुग्णांना बॅड ऑक्सिजन इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. राज्यातलं एकही गाव शिल्लक नाही जिथं या समस्या आ वासून उभ्या नाहीयेत आणि त्याचं कारण आहे गावोगावी ग्रामीण भागात अथवा अगदी जिल्हास्तरावर सुद्धा वैद्यकीय पायाभूत सुविधा पोहोचविल्या जाण्यात अडथळा येत आहे. तातडीने या सुविधा उभ्या करण्यासाठी निधीची मोठी कमतरता आहे. एकीकडे ही समस्या असताना दुसरीकडे धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातल्या 49 खासदारांचा 196 कोटी रुपयांचा खासदार निधी वापराविना पडून आहेत. जर हा निधी खासदारांना मिळाल्यावर त्यांनी खर्च केला असता तर ग्रामीण भागात वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठी मदत झाली असती. मात्र सर्वपक्षीय राजकीय अनास्थेमुळे राज्याची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्याची आहे, अशी टीका संजय शिरोडकर माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी केली आहे. हे ही वाचा- नागपूरमध्ये गॉडफादरचीच हत्या; अड्ड्यावर नोकरीला ठेवलेल्या तरुणांनीच काढला काटा यंदाच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी सगळ्या खासदारांचा खासदार निधी आडवत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे राज्यातच नाही तर देशभरातल्या खासदारांचा खासदार निधी हा तांत्रिक कारणाने अडकून पडला आहे. केंद्र सरकार हा निधी इतर कुठल्याही कारणासाठी वापरू शकत नाही. मात्र तरीही हा निधी आडवून ठेवल्यामुळे स्थानिक स्तरावर किंवा ग्रामीण भागात खासदार निधीतून वैद्यकीय सुविधांसाठी खर्च कोविड काळात होणे अपेक्षित होतं मात्र ते झालेलं नाही. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निधी खासदारांना द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे तर भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकार हा निधी लवकरच देईल अशी माहिती दिली आहे. देशभरात कोरोनामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच ग्रामीण भागातली परिस्थिती पूर्णता हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरील नेतृत्वाच्या हातात आर्थिक ताकद आली तर किमान वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हायला मदत होणे अपेक्षित आहे गरज आहे ती सर्वपक्षीय इच्छाशक्तीची.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona, Mp

पुढील बातम्या