मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात दुहेरी हत्याकांड; कामगारासोबत मुलगी पळून गेल्याचा मनात राग, हॉटेल मालकाकडून दोघांची हत्या

पुण्यात दुहेरी हत्याकांड; कामगारासोबत मुलगी पळून गेल्याचा मनात राग, हॉटेल मालकाकडून दोघांची हत्या

Pune Double Murder:  पुण्यात (Pune) दुहेरी हत्याकांडची (Double murder) घटना घडली आहे. वाचा सविस्तर वृत्त.

Pune Double Murder: पुण्यात (Pune) दुहेरी हत्याकांडची (Double murder) घटना घडली आहे. वाचा सविस्तर वृत्त.

Pune Double Murder: पुण्यात (Pune) दुहेरी हत्याकांडची (Double murder) घटना घडली आहे. वाचा सविस्तर वृत्त.

पुणे, 17 जुलै: पुण्यात (Pune) दुहेरी हत्याकांडची (Double murder) घटना घडली आहे. कामगारासोबत मुलगी पळून गेल्याचं राग मनात धरुन हॉटेल मालकानं (Hotel Owner) हत्या केल्याचं बोललं जात आहे. या घटनेनं पुण्यातील चाकण (Chakan) परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नेमकी घटना काय?

खेड तालुक्यातल्या मौजे करंजविहीरे या गावात ही दुहेरी हत्येची घटना घडली आहे. येथे माणुसकी नावाचं एक हॉटेल आहे. या हॉटेल मालकाचं नाव बाळू मरगज आहे.

माणुसकी हॉटेलच्या समोरचं बाळू मरगज यांची वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर काम करणारा बाळू सिताराम गावडे याच्यासोबत हॉटेल मालकाची 21 वर्षीय मुलगी पळून गेली होती. यात मृत राहुल दत्तात्रय गावडे याचाही सहभाग होता. राहुल बाळू याचा मित्र होता. मालकाची मुलगी पळवून नेण्यासाठी राहुलनं मदत केली होती.

लोणावळ्यात पर्यटकांनी धुडकावला कलम 144, भुशी डॅमवरील गर्दीचा LIVE VIDEO

बाळू आणि हॉटेल मालकाची मुलगी 14 तारखेला पळून गेले होते. मुलीला पळून नेल्याचा राग हॉटेल मालक आरोपी बाळू मरगज याच्या मनात होता.  हॉटेल मालकानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं दोन दिवस तिघांचाही शोध घेतला. त्यानं मुलगी आणि मृत दोघांना हॉटेलवर आणलं. त्यानंतर वीटभट्टी कामगार बाळू सिताराम गावडे आणि राहुल दत्तात्रय गावडे यांना हॉटेलवर आरोपीसह काही जणांनी जबर मारहाण केली.  यात दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत आसखेड खुर्दचे रहिवाशी आहे.

तब्बल सहा जणांच्या टोळक्यांनी दोघांना लाकडी काढी, लोखंडी रॉडनं दोघांना मारहाण केली. या बेदम मारहाणीत दोघांचाही मृत्यू झाला आहे.

अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्र करा उर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव, हॉटेल मालक बाळू मरगज अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे.

First published:
top videos

    Tags: Murder news, Pune, Pune crime