मराठी बातम्या /बातम्या /पुणे /सार्वजनिकरित्या उत्पन्न सांगू नका, अन्यथा..., शरद पवारांचा शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा!

सार्वजनिकरित्या उत्पन्न सांगू नका, अन्यथा..., शरद पवारांचा शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा!

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शरद पवारांनी द्राक्ष बागायतदार आणि उस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Indapur, India

इंदापूर, 1 जानेवारी : नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शरद पवारांनी द्राक्ष बागायतदार आणि उस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली, यावेळी शरद पवारांनी तुमचं उत्पन्न सार्वजनिकरित्या सांगू नका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. इंदापूर तालुक्यातील कळस मधुकर खर्चे यांच्या शेताला शरद पवारांनी भेट दिली.

मधुकर खर्चे यांनी एका एकरात 100 टनापेक्षा अधिक उत्पन्न घेतलं आहे. गेली अनेक वर्ष खर्चे 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. उसाच्या शेताला भेट दिल्यानंतर शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

'साखर उत्पादनात भारत एक नंबरचा देश आहे. ब्राझीलमधल्या लहान शेतकऱ्यांचा उस 50 हजार टन असतो. ब्राझीलमध्ये 6-7 उस उत्पादक शेतकरी कारखाना चालवतात. आपल्याकडे काही हजारात सभासद असतात. याआधी एकरी 100 टन पेक्षा जास्त उस आणि 50 कांडी उस मी बघितला आहे. हे करण्याचा उद्योग खर्चे यांनी केला आहे,' असं शरद पवार म्हणाले.

आधीचे खासदार यायचे नाही, शेतकऱ्यांनी केली तक्रार, पवार म्हणाले, 'मीच होतो खासदार'

'माझ्यासमोर पत्रकार बसले आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्ही सांगितलं की किती उत्पन्न मिळालं. असं सार्वजनिकरित्या सांगू नका. नाहीतर हे लोक दाखवतील शेतकऱ्यांना एवढे पैसे मिळतात, मग दिल्लीतल लोक शेतकऱ्यांना कर लावतील,' असं म्हणत शरद पवारांनी शेतकऱ्यांना सावध केलं.

शरद पवार द्राक्षाच्या मळ्यात

शरद पवार यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या मळ्यांनाही भेट दिली. इंदापूर तालुक्यातील बोरी आणि कळस या गावांना पवार यांनी भेटी दिल्या. 'मी एका ठिकाणी विचारले की खासदार येतात का? तर ते म्हणाले सारखे येतात. आधीचे खासदार कधी येतंच नव्हते तेव्हा मी सांगितले की पूर्वीचा खासदार मीच होतो' असे म्हणताच एकच हशा पिकला.

First published:

Tags: Sharad Pawar