भंडारा, 17 ऑक्टोबर: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात मोबाइल ही नागरिकांची मूलभूत गरज बनली आहे. अगदी नवजात बालकांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकांना मोबाइलने भुरळ घातली आहे. थोड्या काळासाठी जरी मोबाइल सोबत नसला, तर लोकांना अवस्थ व्हायला लागतं. मोबाइलमुळे यापूर्वी अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. यानंतर आता भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मासाळ याठिकाणी देखील एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका विवाहित महिलेनं मोबाइलसाठी आपल्या पतीचे ओठ थेट विळ्याने कापले (wife cut husband’s lips with scythe) आहेत. या घटनेत पीडित पतीला गंभीर दुखापत (Husband injured) झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जखमी पतीचा जबाब नोंदवून घेतला असून पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा- दसऱ्याच्या दिवशीच हिरावले बहीण-भाऊ; भीषण अपघातात चिमुकल्या भाचीसह तिघांचा अंत खेमराज बाबूराव मूल असं जखमी झालेल्या 40 वर्षीय पतीचं नाव असून ते लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील रहिवासी आहेत. जखमी खेमराज यांचा दोन दिवसांपूर्वी मोबाइल खराब झाला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाइल काही दिवस वापरण्यासाठी घेतला होता. दोन दिवस उलटून देखील पतीने मोबाइल परत केला नव्हता. यामुळे पत्नीला आपल्या पतीचा राग आला होता. यातूनच गुरुवारी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हेही वाचा- मण्यारचा दंश झालेल्या सायलीची मृत्यूशी झुंज अपयशी; भावानंतर बहिणीचाही अंत हे भांडण इतकं विकोपाला गेलं की, संतापलेल्या पत्नीने धारदार विळा पती खेमराज यांना फेकून मारला. या विळा थेट खेमराज यांच्या ओठावर लागून त्यांचे ओठ कापले गेले आहेत. यामुळे खेमराज रक्तबंबाळ झाले. यानंतर स्थानिक लोकांनी खेमराज यांना तातडीने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय तपासणी आणि खेमराज यांच्या जबाबनंतर पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.