'पण, सध्या मी मूर्ख ठरतोय...' असं का म्हणाले असावे देवेंद्र फडणवीस!

'पण, सध्या मी मूर्ख ठरतोय...' असं का म्हणाले असावे देवेंद्र फडणवीस!

'मी पुन्हा येईन', अशी फडणवीस यांनी घोषणा करताच सभागृहात टाळ्या आणि शिट्या वाजल्या....

  • Share this:

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड,11 जानेवारी: पिंपरी चिंचवडमध्ये 'मोरया युथ फेस्टिव्हल'ला जोरदार सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते शनिवारी 'मोरया युथ फेस्टिव्हल'चे उद्घाटन झाले. यावेळी प्रसिद्ध मुलाखतकार राहुल सोलापूरकर आणि सचिन पटवर्धन यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. एका प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी चक्क 'पण, सध्या मी मूर्ख ठरतोय...', असे उत्तर दिले. फडणवीस यांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

'विद्यालय-महाविद्यालयीन जीवनातील डिबेट किंवा भाषणांबद्दल काय सांगाल?, मुलाखतकार राहुल सोलापूरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना असा प्रश्न केला होता. प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'विद्यालयीन-महाविद्यालयीन काळात मी डिबेटमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी पाच ते सात मिनिटांचे मी भाषण पाठ करून आलो. पहिल्या दोन मिनिटांच्या भाषेत एक छोटीशी कविता सादर केली. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे मला काही सेकंद थांबावं लागलं. पण त्यावेळी मी पुढचं विसरलो अन् गडबडून गेलो. ती वेळ मी मारून नेली, पण नंतर मी जाहीर बोलायला घाबरलो. अनेकांनी विनवण्या केल्या, काहींनी दिलेले सल्ले अवलंबले. तरीही भीती जात नव्हती, अशात एक सल्ला मिळाला. आपण बोलायला उभं राहतो. तेव्हा समोर ऐकणारे मूर्ख आहेत, असं समजून बोलायचं. तो सल्ला मी अवलंबला आणि मी व्यक्त झालो.' त्यावर राहुल सोलापूरकर यांनी 'सध्या हेच धोरण अवलंबता का?' हा प्रतिप्रश्न केला. त्यावर 'नाही, ते तेव्हाच विसरलो. पण, सध्या मी मूर्ख ठरतोय.', असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मी पुन्हा येईन, फडणवीसांच्या वक्तव्यावर टाळ्या आणि शिट्या...

'आजही तुम्हीच महाराष्ट्रचे CM आहेत, असं वाटतं याच कारण काय?' या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला 5 वर्षे मिळाली होती, त्यात माझ्याकडे गमवण्यासारखे काहीही नव्हतं, राजकारणात मी कुणाला संपविण्यासाठी किंवा आकसाने कधीच केले नाही. सकारात्मक काम करत राहिलो म्हणून अशी प्रतिमा निर्माण झाली असेल. त्यानंतर फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन" अशी घोषणा केली. त्यावर सभागृहात टाळ्या आणि शिट्या वाजल्या.

Published by: Sandip Parolekar
First published: January 11, 2020, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading