• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • एकच नंबर! दिवाळी आधी अजित पवारांनी पुणेकरांना दिलं मोठं गिफ्ट, दिली मोठी परवानगी

एकच नंबर! दिवाळी आधी अजित पवारांनी पुणेकरांना दिलं मोठं गिफ्ट, दिली मोठी परवानगी

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुणेकरांना आनंदाची (good news) बातमी दिली आहे.

  • Share this:
    पुणे, 22 ऑक्टोबर: पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुणेकरांना आनंदाची (good news) बातमी दिली आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे अजित पवारांनी पुण्यात दिवाळी पहाट (Diwali Pahat events) कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुणेकरांना दिवाळीआधी मोठं गिफ्ट दिलं आहे, असंच म्हणावं लागेल. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. तसंच दिवाळीनंतर थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हेही वाचा-  फक्त एका क्लिकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे पुण्यातल्या ग्रामीण भागातले आठवडे बाजार सुद्धा सुरु करण्यास परवानगी दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पिक विमा कंपन्यांना दिला दम राज्यात शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नसल्याचं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नवी अपडेट,  NCB ची मोठी कारवाई राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारनं हजारो कोटी रुपयांचं पीक विम्याचं पैसे भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन आणि इतर शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असं अजित पवार यांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published: