मुंबई, 22 ऑक्टोबर: या महिन्याच्या सुरुवातील एनसीबीनं (NCB raid) मुंबईत क्रूझवर (cruise in Mumbai) छापेमारी करत ड्रग्ज पार्टीचा पदार्फाश केला होता. या प्रकरणी एनसीबीनं बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor Shah Rukh Khan) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अनेकांना अटक केली. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी आता नवी अपडेट समोर येत आहे. मुंबईत एनसीबीनं काल रात्री उशिरा एका 24 वर्षीय ड्रग्ज विक्रेत्याला (drug peddler ) ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण या प्रकरणातील प्रमुख संशयित असून ज्याचं नाव ड्रग्जशी संबंधित चॅटमध्ये समोर आलं असल्याचं एनसीबीनं म्हटलं आहे. या तरुणाला मध्यरात्री 3.45 वाजता NCB कार्यालयात आणण्यात आले आहे.
Drugs-on-cruise case | Mumbai NCB detained a 24-year-old drug peddler late last night. He is a prime suspect in the matter whose name has surfaced in the drugs-related chat: NCB
— ANI (@ANI) October 22, 2021
दरम्यान आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी आणखी दोघांना समन्स पाठवण्यात आले आहेत. चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे समन्स दोन अभिनेत्यांच्या मुलींना पाठवलेत. या समन्समध्ये आज चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा- नवाब मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंची चौकशी होणार?, गृहमंत्री म्हणाले… आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आर्यन खान गेल्या 14 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. एनसीबीने त्याच्यावर ड्रग्ज घेणे आणि इंटरनॅशनल ड्रग्ज ट्रॅफिकिंगशी संबंधित आरोप लावला आहे. आर्यन खानच्या जामीनाचा अर्ज आजही कोर्टाने फेटाळला असून 30 ऑक्टोबरपर्यंत त्याला आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे. दरम्यान आर्यन खान याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. हेही वाचा- आजपासून चित्रपटगृहे Unlock,नाट्यगृहात होणार तिसरी घंटा आर्थर रोड तुरुंगात पोहोचला शाहरुख गुरुवारी सकाळी साधारण सव्वानऊच्या सुमारास शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगतमध्ये आर्यनच्या भेटीसाठी पोहोचला होता. त्याची आणि आर्यनची साधारण दहा मिनिटं भेट झाली. कोरोना मुळे बंदी असलेल्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येत नव्हते मात्र आजपासून दोन व्यक्तींना भेटता येणार आहे. त्यामुळे शाहरूख खाननं गुरुवारी आर्यनची भेट घेतली. या दरम्यान मीडियाने शाहरुखला घेरलं होतं. मात्र या भेटीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता शाहरुख निघून गेला.