मनसे नगरसेवकावर भडकले अजित पवार; म्हणाले, लांबून बोला...आमचे 4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह!

मनसे नगरसेवकावर भडकले अजित पवार; म्हणाले, लांबून बोला...आमचे 4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह!

फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 7 ऑगस्ट: आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोलणं, फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. मात्र, एव्हढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलेच कशाला, असा सवाल आता नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे. एवढंच नाही तर अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा...मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश, प्रशासनाचे नवे आदेश

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो covid सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली. या दौऱ्यात सेंटरची माहिती घेण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासनातील सुमारे 40 हून अधिक अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं तर त्याहीपेक्षा जास्त संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित झाल्याने आधीच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.

याच दौऱ्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षाच्या गट नेत्यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यानुसार आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते. मात्र अजित पवारांनी एकूण घेणं तर दूरच उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं मनसेचे गट नेते तथा नगरसेवक सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवारांच्या नकळत हा प्रकार घडला. मास्क लावलेला असल्याने नेमकं कोण आहे, ते त्यांच्या लक्षात आलं नसावं. सोशल डिस्टसिंगबाबत त्यांनी दिलेल्या योग्य आहेत. मात्र, त्याचा विपर्यास करून गैरसमज करून घेऊ नये अशी विनंती संबधित सन्मानीय नगरसेवकास केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मागण्या अजित पवारांशी प्रत्यक्ष भेटून ठेवणार आहोत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिलं आहे.

दुसरीकडे, पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. एका दिवसात कोरोनानं 24 जणांचा बळी घेतला. तर 1012 नवे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असं आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

हेही वाचा...इंदुरीकर महाराजांना दिलासा, जिल्हा न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26118 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 17673 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 444 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2020, 1:49 PM IST

ताज्या बातम्या