Home /News /pune /

Ajit Pawar : ‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा ऊस उत्पादकांचा आदर्श घ्या, एकरी 100 टन उत्पादन घेतात’ 

Ajit Pawar : ‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा ऊस उत्पादकांचा आदर्श घ्या, एकरी 100 टन उत्पादन घेतात’ 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही ऊस उत्पादक शेतकरी (kolhapur and sangli sugarcane farmer) एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

    पुणे, 8 मे : एकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी (sugarcane farming) उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केले. माळेगाव इंजिनिअरींग कॉलेजच्या शरद सभागृहामध्ये आयोजित शंभर टन ऊस उत्पादन अभियान व शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले कि, कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या एकरी 100 टन ऊस उत्पादन अभियान हा एक चांगला उपक्रम आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही ऊस उत्पादक शेतकरी (kolhapur and sangli sugarcane farmer) एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. त्यांचा आदर्श घेवून येथील शेतकऱ्यांनीही उत्पादनात वाढ करावी. सध्याच्या काळात शेतीत नवनवीन प्रयोग होत आहेत. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून नवीन प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे. शेती करतांना बियाणे निवड, खत मात्रा, सिंचनाचा वापर, ठिबक यंत्रणा व तज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. शेतकऱ्यांना काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे. हे ही वाचा : Asani Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, येत्या 24 तासात वेग वाढणार, ‘या’ राज्यांना alert विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून ऊस पिकांची लागवड केली जाते. साखरेला दर चांगला आहे. परदेशात निर्यात केल्यास चांगला फायदा मिळेल. सध्या साखरेचा खूप मोठा साठा शिल्लक आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे कल वळवावा. ऊसाऐवजी शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे वळावे. सध्या कापसाला चांगला दर आहे. अशी पिकेही शेतकऱ्यांनी घ्यावीत, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी पाचट शेतामध्ये जाळू नये. पर्यावणाचे रक्षण करावे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पाचटाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले. ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भरत रासकर  व कृषी महाविद्यालय पुणेचे समन्वयक डॉ. धरमेंद्रकुमार फाळके यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत शेती औजारांसाठी बारामती उपविभागात एकूण 4 हजार 130 शेतकऱ्यांना अनुदान  मंजूर करण्यात आले आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना औजारेंचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बारामती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदलसह इंदापूर आणि पुरंदर येथील कृषी अधिकारी अनुक्रमे भाऊ रुपणवार, सुरज जाधव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, श्री सोमेश्वर सहकारी  साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे आदी उपस्थित होते.
    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Ajit pawar, Pune (City/Town/Village), Pune ajit pawar, Sugar facrtory, Sugarcane farmer

    पुढील बातम्या