Home /News /crime /

गच्चीवर झोपलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, एका चपलेमुळे झाला खुनाचा उलगडा

गच्चीवर झोपलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, एका चपलेमुळे झाला खुनाचा उलगडा

गच्चीवर झोपलेल्या पतीची (Husband) आपल्या प्रियकराच्या (Lover) मदतीनं हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे.

    लखनऊ, 9 ऑगस्ट : गच्चीवर झोपलेल्या पतीची (Husband) आपल्या प्रियकराच्या (Lover) मदतीनं हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे. आपल्या पतीला रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या (Sleeping pills) देऊन त्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. अशी घडली घटना उत्तर प्रदेशमधील बमनयी गावात राहणाऱा 34 वर्षांचा खेमकरण हा रोज जेवण झाल्यानंतर रात्री घराच्या गच्चीवर झोपत असे. त्याची पत्नी चांदनीचं कृष्णा नावाच्या तरुणासोबत प्रेम प्रकऱण सुरू होतं. विशेष म्हणजे खेमकरण हा कृष्णाचा मामेभाऊ होता. आपल्या पत्नी आणि कृष्णामधील जवळीक खेमकरणच्या लक्षात आली होती आणि त्यानं याला वारंवार आक्षेप घेतला होता. चांदनीची कृष्णासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र खेमकरण याच्या आड येत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला. खेमकरणला रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यामुळे खेमकरणला गाढ झोप लागली. त्यानंतर कृष्णा फावडं घेऊन गच्चीवर गेला आणि खेमकरणाच्या गळ्यावर जोरदार वार करून त्याचा जीव घेतला. मात्र यावेळी गळ्यावर वार झाल्यानंतर खेमकरणने जोरात किंकाळी फोडली. त्यामुळे घाबरलेल्या कृष्णानं घराच्या मागच्या बाजूला फावडं फेकून दिलं आणि तिथून पळ काढला. असा झाला उलगडा दुसऱ्या दिवशी पोलिसांत कुटुंबीयांनी तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. खेमकरणचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. त्यावेळी एक अज्ञात चप्पल घरात असल्याचं त्यांना दिसलं. ती चप्पल कुणाची, याचं उत्तर घरातील कुणालाच देता आलं नाही. त्यानंतर संशयावरून पोलिसांनी पत्नी चांदनीची कसून चौकशी केली असता, तिनं गुन्हा कबूल केला. हे वाचा -SUV कार दिली नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार खुनाच्या वेळी खेमकरणनं किंकाळी फोडल्यामुळं घाबरलेला कृष्णा चप्पल न घालताच पळून गेला. त्याच्या चपलेवरून पोलिसांना खुनाचा उलगडा झाला. कृष्णा आणि चांदनीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Murder, Uttar pardesh

    पुढील बातम्या