जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 'वरना सर में गोली मारेंगे' फडणवीसांच्या खास आमदाराला धमकी, 30 लाखांची मागितली खंडणी, पुण्यात खळबळ

'वरना सर में गोली मारेंगे' फडणवीसांच्या खास आमदाराला धमकी, 30 लाखांची मागितली खंडणी, पुण्यात खळबळ

अलीकडेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती.

अलीकडेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती.

महेश लांडगे यांच्या संपर्क कार्यालय मार्फत चालवल्या जाणाऱ्या परिवर्तन हेल्प लाईनच्या सोशल मीडिया पेजवर धमकीचे मेसेज आले होते.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 07 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना वारंवार धमकी देण्याचे प्रकार घडत आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. आता फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार तथा शहर अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संपर्क कार्यालय मार्फत चालवल्या जाणाऱ्या परिवर्तन हेल्प लाईनच्या सोशल मीडिया पेजवर धमकीचे मेसेज आले होते.

News18लोकमत
News18लोकमत

30 लाखांची खंडणी न दिल्यास गोळी मरून हत्या केल्याची धमकी दिली होती. धमकीच्या मेसेज प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञता विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसाच्या गुन्हे शाखेने दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. (जे विद्रोही आहेत त्यांच्या मी पाठिशी; मग लढाई.., रोशनी शिंदेंवरून आव्हाडांचा पुन्हा इशारा) ताब्यात घेतलेल्या तरुणांची सध्या कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का आणि धमकी देणाऱ्या तरुणांचा गुन्हेगारांशी संबंध आहे का? याचा तपास सुरू असल्याची माहिती महेश लांडगे यांनी दिली आहे. (पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी; ‘ही’ 3 नावं आघाडीवर) आपण अशा कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, मात्र काळ सोकावता कामा नये जर कोणी यामागे असेल तर त्यांनी थेट आपल्यासमोर यावं आपण त्याला जशास तसे उत्तर देऊ. मात्र आपला पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे आणि ते सत्य समोर आणतील, असंही महेश लांडगे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात