पतीची निघृणपणे हत्या करुन बदलापूर-कर्जत रोडच्या कडेला फेकला मृतदेह, नंतर पोलीस ठाण्यात केली तक्रार

पतीची निघृणपणे हत्या करुन बदलापूर-कर्जत रोडच्या कडेला फेकला मृतदेह, नंतर पोलीस ठाण्यात केली तक्रार

डोंबिवलीतील एका महिलेने हा धक्कादायक प्रकार केला आहे.

  • Share this:

डोंबिवली, 18 जून : डोंबिवली येथील एका रिक्षाचालक महिलेने आपल्या रिक्षाचालक प्रियकाराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आहे. हत्या करून पतीचा मृतदेह बदलापूर कर्जत रोडच्या कडेला फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आपले कृत्य लपवण्यासाठी तिने पती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली. मात्र कल्याण क्राइम ब्रांचने या महिलेचे बिंग फोडले आहे. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.

या प्रकरणी लक्ष्मी पाटील, अरविंद उर्फ मारी रविंद्र राम आणि सनी सागर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मृत प्रवीण पाटील हा खाजगी कंपनीत नोकरीला होता. तर लक्ष्मी रिक्षा चालवायची. तिथेच तिची अरविंद या रिक्षा चालकासोबत प्रेम सबंध जुळले होते.

डोंबिवली मानपाडा येथे राहणारा प्रवीण पाटील हा 4 जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी लक्ष्मी हिने मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. बरेच दिवस उलटूनही प्रवीणचा शोध लागत नव्हता. त्यामुळे प्रवीणच्या कुटुंबीयानी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रांचकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करत असताना कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकाचा लक्ष्मीवर संशय बळावला. पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली असता चौकशी दरम्यान तिने खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

हे ही वाचा-इंटरनेटवर पाहून 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या;मास्क लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

त्यानंतर पोलिसांनी लागलीच तिच्या संपर्कात असलेल्या अरविंद उर्फ मारी रविंद्र राम आणि त्याचा मित्र सनी सागर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. अरविंदचे लक्ष्मी सोबत अनैतिक प्रेमसबंध होते. याची कुणकुण लक्ष्मीचा पती प्रविणला लागली होती. या कारणावरून प्रवीण आणि लक्ष्मीमध्ये वाद होत होते. त्यामुळे या दोघांनी प्रवीणचा काटा काढायचं ठरवले. 2 जून रोजी रात्रीच्या सुमारास प्रवीण घरी असताना अरविंद आणि सनी घरी आला त्यानी प्रवीणला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात लक्ष्मी देखील सहभागी होती. त्यांनतर तिघांनी त्याचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह रिक्षात टाकून बदलापूर-कर्जत रोडच्या शेजारी टाकून दिला होता. संशय येऊ नये म्हणून लक्ष्मीने मानपाडा पोलीस ठाण्यात प्रवीण बेपत्ता असल्याबाबत तक्रार देखील नोंदवली होती. मात्र प्रवीणच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रांचकडे धाव घेतली व कल्याण क्राइम ब्रँचच्या पथकाने मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा उलगडा केला. याप्रकरणी लक्ष्मी अरविंद आणि त्यांचा साथीदार सोनी याला देखील अटक केल्याचे कल्याण क्राइम ब्रांच पोलीस निरीक्षक नितीन मगदूम यांनी सांगितले.

Published by: Meenal Gangurde
First published: June 18, 2021, 5:15 PM IST

ताज्या बातम्या