मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

228 तोळे सोन्याचा खास पाळणा, गणेश जन्म सोहळ्यासाठी दगडुशेठ मंदिर सजले

228 तोळे सोन्याचा खास पाळणा, गणेश जन्म सोहळ्यासाठी दगडुशेठ मंदिर सजले

बुधवारी पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान हे सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण करणार आहेत. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

पुणे, 23 जानेवारी: माघ चतुर्थीला म्हणजेच बुधवारी 25 जानेवारी रोजी दगडुशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाची नक्षी अशी सजावट असलेला खास सुवर्णपाळणा तयार करण्यात आला आहे. ट्रस्टच्या अध्यक्षांनी गणेश जन्म सोहळ्याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा सुवर्णपाळण्यात हा सोहळा पार पडणार आहे.

बुधवारी पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान हे सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण करणार आहेत. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. त्यापूर्वी पहाटे 3 वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे.

हेही वाचा : दारिद्र्यात जन्मलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची मालमत्ता किती? दिवसाला कमवतात हजारो..

सकाळी 7 वाजता गणेशयाग, दुपारी 3 वाजता सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, सायंकाळी ६ वाजता नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. तसेच रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत गणेश जागर मंदिरामध्ये होणार आहे. मंदिरात आकर्षक पुष्पआरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पहाटे 3 पासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

भक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा साकारण्यात आला आहे. पाळण्याकरिता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टँड तयार करण्यात आला असून त्यावर 8.5 किलो चांदी वापरण्यात आली आहे. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे. या स्टँडवर 16 बाय 24 इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्याकरिता 2 किलो 280 ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.

First published:

Tags: Dagdusheth ganpati, Ganesh chaturthi, Pune