Home /News /pune /

पुणेकरांनो सावधान! मास्क न घालता बाहेर पडलात तर खैर नाही, होणार जबर दंड

पुणेकरांनो सावधान! मास्क न घालता बाहेर पडलात तर खैर नाही, होणार जबर दंड

त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.

त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.

'पुण्यात आणखी एक सिरो सर्व्हे होणार आहे. मास लेवलला सँपलिंग घेतलं जाईल.'

पुणे 05 सप्टेंबर: पुण्यात वेगाने होणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी शनिवारी सर्व लोक प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी कोरोनाला रोखण्यासाठी बेशिस्त नागरीकांवर दंडाची कारवाई करणार असल्याचं सांगितलं. अशा लोकांमुळेच कोरोनाचा प्रसार होत असल्याचंही ते म्हणाले. जावडेकर पुढे म्हणाले, पुणे कोरोनासंबंधी आढावा बैठक झाली. याला सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अनेक सूचना आल्या लोकप्रतिनिधींकडून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आल्या. पुण्यात आणखी एक सिरो सर्व्हे होणार आहे. मास लेवलला सँपलिंग घेतलं जाईल. मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे. सगळ्या एजन्सींचे को ऑर्डिनेशन केलं जाणार आहे. पुण्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार आपला वाटा निश्चित उचलेल. कोरोनाचा कहर थांबेना! गणपतीत एकत्र आलेल्या एका परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह असा होणार दंड मास्क न घातल्यास 500 रूपये दंड रस्त्यावर थुंकल्यास 1000 रूपये दंड पिंक बहाद्दरावर यापुढेही कठोर कारवाई करणार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात ही दंडाची कारवाई होणार आहे. त्यामुळे बेशिस्त लोकांना चाप बसणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काय म्हणाले अजित पवार? पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता आहे, काही चुका झाल्या आहेत अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले,ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत माहीत हे वस्तूस्थिती आहे. अ‍ॅम्ब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची चिंताजनक आकडेवारी, कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण ससूनचा ऑक्सीजन तुटवडा प्रॉब्लेम झाला म्हणून जम्बोत पेशंट पाठवले. पुण्यात लॉकडाऊन उठवण्यावरून सीएमची वेगळी भूमिका होती पण पुणातील व्यापारी आक्रमक होते. म्हणून लॉकडाऊन उठवलं अशी माहितीही त्यांनी दिली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus, Prakash javdekar

पुढील बातम्या