मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची चिंताजनक आकडेवारी, कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची चिंताजनक आकडेवारी, कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण

 सलग दुसऱ्या दिवशी 86 हजार नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी 86 हजार नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी 86 हजार नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मुंबई, 05 सप्टेंबर : सप्टेंबरच्या महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. एका दिवसात सलग दुसऱ्या दिवशी 86 हजार नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. इतकच नाही तर भारतानं आतापर्यंत 40 लाखाचा आकडा पार केला आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे गेल्या 24 तासांत 86 हजार 432 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

एका दिवसात 86 हजारहून अधिक सलग दुसऱ्या दिवशी लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 089 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 8 लाख 46 हजार 395 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 69,561 वर पोहोचला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 19 हजार 218 रुग्णांची वाढ झालीय. आत्तांपर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. कोरोनाचा प्रसार आता ग्रामीण भाग होत असून मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 1929 रुग्ण आढळले.

राज्यात 2 लाख 10हजार 978 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 8 लाख 63 हजार 062वर गेली आहे.

राज्यात दिवसभरात 378 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 13 हजार रुग्ण बरे होऊन घरी. सगळे व्यवहार सुरु झाल्याने ही संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms