पुण्यात ‘कोरोना’चा प्रवेश, महापालिकाने काही तासांमध्ये उभारलं 200 खाटांचं रुग्णालंय

पुण्यात ‘कोरोना’चा प्रवेश, महापालिकाने काही तासांमध्ये उभारलं 200 खाटांचं रुग्णालंय

या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

पुणे 10 मार्च :  पुण्यात ‘कोरोना’चे दोन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पुणे महापालिकेने युद्ध स्तरावर कामाला सुरुवात केलीय. कोरोनाच्या रुग्णांसाठी वेगळ्या हॉस्पिटलची आणि आयसोलेशन वॉर्डसची गरज असल्याने अवघ्या काही तासांमध्ये पालिकेने 200 खाटांची व्यवस्था केली असून लवकरच हे तात्पुरतं हॉस्पिटल सुरु होणार आहे. राजयोग सोसायटी आणि सणस मैदानातील इमारतीत हे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची महिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. विभागीय आयुक्तालृयात तातडीची बैठक झाली. यात विभागीय आयुक्त, कलेक्टर, पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी बैठकीत हजर आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरूअसून त्यांना खास वॉड्समध्ये ठेवण्यात येणार आहे.

देशातल्या इतर राज्यांनंतर आता महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाव्हायरस (Coronavirus) पोहोचला आहे. पुणे (Pune) शहरात कोरोनाव्हायरसचे 2 रुग्ण सापडलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रुग्ण दुबईहून (Dubai) महाराष्ट्रात परतले होते.

हे वाचा - बहिणीला वाचवायला भाऊ धावून आला, माजी सैनिक असलेल्या भावजीने केला गोळीबार

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील दोन्ही व्यक्तींचे कोरोनाव्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. या रुग्णांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

 या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मूळ शहरात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणं आढळलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही.

हे वाचा -  दिलासादायक! नाशिकच्या कोरोना कक्षातील पाचवा संशयितही निगेटिव्ह

होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.

 

 

First published: March 10, 2020, 10:37 AM IST

ताज्या बातम्या