मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दिलासादायक! नाशिकच्या कोरोना कक्षातील पाचवा संशयितही निगेटिव्ह

दिलासादायक! नाशिकच्या कोरोना कक्षातील पाचवा संशयितही निगेटिव्ह

नाशिकच्या कोरोना कक्षात पाच संशयित रुग्ण दाखल होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे

नाशिकच्या कोरोना कक्षात पाच संशयित रुग्ण दाखल होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे

नाशिकच्या कोरोना कक्षात पाच संशयित रुग्ण दाखल होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नाशिक, 10 मार्च : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान  नाशिकच्या कोरोना कक्षातील पाचवा संशयितही निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूझीलंडहून आलेल्या या सिनिअर सिटीझनच्या तपासणी अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

इराण, इराक, दुबई, अमेरिका आणि न्यूझीलंडहून आलेले पाचही प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानं नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. नाशिक जवळील इगतपूरी येथील विपश्यना केंद्रात मोठ्या संख्येने परदेशी नागरिक येत असतात. त्यात जगभरात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला रोखणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर विपश्यना केंद्रात येणाऱ्या परदेशी नागरिकांचा प्रवेश रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित - रुग्णालयातून पळाला 'कोरोना'चा रुग्ण, भीतीनं खासदारांनी स्वत:लाच घरात कोंडलं

भारतात आणखी 2 राज्यांमध्ये पोहोचला व्हायरस

भारतात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका वाढला आहे. आता आणखी 2 राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. कर्नाटक (Karnataka) आणि पंजाबमध्ये (Punjab) कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे.

कर्नाटकच्या बंगळुरूत (Bengaluru) एका आयटी इंजिनीअरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकातील हा पहिला रुग्ण आहे.

हेही वाचा- सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’

कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण पत्नी आणि मुलीसह यूएसमधून 1 मार्चला भारतात आला. 5 मार्चपासून त्याच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आली, आता त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्यासह प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाही वेगळं वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे"

तर पंजाबमध्येही कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला आहे. पंजाबचे मुख्य सचिव (आरोग्य) अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं की, 'एअर इंडियाच्या विमानानं हा कोरोनाग्रस्त रुग्ण इटलीच्या मिलानहून भारतात आला. कुटुंबातील अन्य 2 व्यक्तींसह हा रुग्ण 4 मार्चला अमृतसर विमानतळावर पोहोचला. तपासणीत त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं स्पष्ट झालं. '

First published:

Tags: Corona virus, Nashik, Negative, Patient