पुणे, 17 मार्च : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धसका सर्वांनी घेतला आहे. आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये, म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जाते आहे. त्यामुळे मास्क (mask) आणि सॅनिटायझरची (sanitizer) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याचाच गैरफायदा घेतला जात आहे. लोकांच्या भीतीचा फायदा घेत काही जण बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स बनवत आहेत. पुण्यात (pune) असे तब्बल 27 लाख रुपयांचे सॅनिटायझर्स जप्त करण्यात आलेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे वाचा - घाबरू नका, काळजी घ्या; भारत अद्यापही कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं की, “पुण्यात गुन्हे शाखेकडून 27 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे” दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतही असं बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा घालण्यात आला होता. त्यावेळी तब्बल 1 लाख 10 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. वाकोला इथे FDA ने ही कारवाई केली होती. कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे सांताक्रूझ परिसरातल्या वाकोला इथे एका छोट्या कारखान्यात कुठलंही लायसन्स न घेता अचानकपणे सॅनिटायझर तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. हे वाचा - FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार? ‘कोरोना व्हायरसच्या वाढता प्रकोप बघता नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही. मास्कची गरज केवळ उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आहे’, असं नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर सॅनिटायझरऐवजी साबणानेही 40 सेकंद शास्त्रोक्त पद्धतीने हात धुवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. हे वाचा - ‘कोरोना’वर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही व्हायरस, आणखी काही डॉक्टरांचा जीव धोक्यात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.