मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Coronavirus Pune News: पुण्यात विभागीय आयुक्तांनाही कोरोना; संसर्गाचा वेग वाढला, धक्कादायक आकडेवारी समोर!

Coronavirus Pune News: पुण्यात विभागीय आयुक्तांनाही कोरोना; संसर्गाचा वेग वाढला, धक्कादायक आकडेवारी समोर!

आता कोरोनाव्हायरसची दुसरी लाट (Second wave of corona virus Pune) आल्याचं चिन्ह आहे आणि त्याचा सर्वांत जास्त फटका पुण्यालाच बसत आहे.

आता कोरोनाव्हायरसची दुसरी लाट (Second wave of corona virus Pune) आल्याचं चिन्ह आहे आणि त्याचा सर्वांत जास्त फटका पुण्यालाच बसत आहे.

आता कोरोनाव्हायरसची दुसरी लाट (Second wave of corona virus Pune) आल्याचं चिन्ह आहे आणि त्याचा सर्वांत जास्त फटका पुण्यालाच बसत आहे.

    पुणे, 16 मार्च : गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातच पुण्यात कोरोनाव्हायरसचं (Coronavirus in Pune) थैमान सुरू झालं होतं. दिवाळीनंतर डिसेंबरपर्यंत संसर्गाचा (Covid-19 latest updates) वेग मंदावला आणि या साथीवर विजय मिळवल्याचं चित्र निर्माण झालं. पण आता कोरोनाव्हायरसची दुसरी लाट (Second wave of corona virus Pune) आल्याचं चिन्ह आहे आणि त्याचा सर्वांत जास्त फटका पुण्यालाच बसत आहे. पुण्यात मंगळवार 16 मार्चचा कोरोना संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांचा आकडा (Latest corona figures in Pune) 1925 वर पोहोचला आहे. Covid-19 ची साथ शिखरावर असताना असे आकडे येत होते आता पुन्हा तोच जोर साथीने गाठलेला दिसतो. कोरोना काळात मोठी प्रशासकीय जबाबदारी पेलणारे विभागीय आयुक्त सौरभ राव (Pune divisional commissioner Saurabh Rao) यांनाही कोरोनाने गाठलं आहे.

    सौरभ राव यांच्यावर पुण्यासह कोल्हापूर ,सातारा ,सांगली ,सोलापूर  या 5 जिल्ह्यांची जबाबदारी आहे. राव हे विभागीय आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.

    देशात सर्वाधिक पुण्यात

    देशातील सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आणि जिल्ह्यात आढळत आहेत. त्यामुळे पुणेकरांसाठी कोरोना विषाणूही चिंतेची बाब बनत चालली आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, केंद्राचा राज्य सरकारला धोक्याचा इशारा

    याच पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील 18 वर्षे आणि पुढील सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यात यावी, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. पण सध्या सुरू असलेल्या लसीकरण प्रक्रियेत मात्र अजूनही गोंधळच सुरू आहे.

    लसीकरणाच्या गडबडी सुरूच

    पुण्यात लशींच्या पुरवठ्यावरून सोमवारी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हीच गोंधळाची परिस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम होती. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड (Covishield) ऐवजी भारत बायोटेकने बनवलेल्या covaxinचा साठा मिळाल्याने नियोजित लसीकरणामध्ये (Pune Corona Vaccination) मोठा अडथळा आला. नियोजित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अचानक लसीकरण रद्द झाल्याचे एसएमएस मोबाईलवर मिळाले आहेत. ज्यांची लसीकरणाची वेळ उद्या निश्चित करण्यात आली होती त्यांनाही अशाच पद्धतीचे मेसेज आले आहेत आणि लसीकरणासाठी पुन्हा नव्याने नोंदणी करून वेळ निश्चित करून घेण्यास सुचवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे आज लसीकरणामध्ये दिवसभर मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

    पुण्यात वेगवेगळ्या लशींचा पुरवठा झाल्याने मोठा गोंधळ, नागरिकांमध्ये नाराजी

     लसीकरण केंद्रांवर गेलेल्या नागरिकांना बराच वेळ वाट पाहत राहावे लागली. त्यात कोविशील्डऐवजी covaxin चा साठा आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभाग संभ्रमात पडला. यापूर्वी ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी आता कुठली लस वापरायची याबाबत आरोग्य विभागामध्ये मोठी चिंता निर्माण झाली.

    First published:
    top videos

      Tags: Coronavirus, Covid-19 positive, Pune