• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यात वेगवेगळ्या लशींचा पुरवठा झाल्याने मोठा गोंधळ, नागरिकांमध्ये नाराजी

पुण्यात वेगवेगळ्या लशींचा पुरवठा झाल्याने मोठा गोंधळ, नागरिकांमध्ये नाराजी

Pune Corona Vaccination : कोविशील्डच्या ऐवजी covaxinचा साठा मिळाल्याने नियोजित लसीकरणामध्ये मोठा अडथळा आला.

  • Share this:
पुणे, 15 मार्च : पुण्यात लशींच्या पुरवठ्यावरून आज मोठा गोंधळ निर्माण झाला. कोविशील्डच्या ऐवजी covaxinचा साठा मिळाल्याने नियोजित लसीकरणामध्ये (Pune Corona Vaccination) मोठा अडथळा आला. त्यामुळे आज लसीकरण नियोजित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अचानक लसीकरण रद्द झाल्याचे एसएमएस मोबाईलवर मिळाले आहेत. ज्यांची लसीकरणाची वेळ उद्या निश्चित करण्यात आली होती त्यांनाही अशाच पद्धतीचे मेसेज आले आहेत आणि लसीकरणासाठी पुन्हा नव्याने नोंदणी करून वेळ निश्चित करून घेण्यास सुचवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे आज लसीकरणामध्ये दिवसभर मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. लसीकरण केंद्रांवर गेलेल्या नागरिकांना बराच वेळ वाट पाहत राहावे लागली. त्यात कोविशील्डऐवजी covaxin चा साठा आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभाग संभ्रमात पडला. यापूर्वी ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी आता कुठली लस वापरायची याबाबत आरोग्य विभागामध्ये मोठी चिंता निर्माण झाली. नवीन लस देण्यात येणार्‍या नागरिकांना लस देण्यासाठीची नवी प्रक्रिया सुरू करावयाची असल्याने आज नियोजित असलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी उद्या न येण्याचे मेसेज पाठवण्यात आले. त्यामुळे नागरिकही गोंधळात पडले आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारीही संभ्रमामध्ये आहेत. या सगळ्या प्रक्रियेवर तातडीने खुलासा करून नियोजित पद्धतीने लसीकरण मोहीम पुन्हा राबविण्याची गरज आहे. हेही वाचा - Sangali News : झुंज अपयशी, कोरोनाला मात देणाऱ्या सांगलीतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन ज्या नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करून घेतलेली होती त्या नागरिकांच्या नियोजनाचा पूर्ण बोऱ्या वाजला. आता ही प्रक्रिया पुन्हा करावयाची असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं मत लसीकरण रद्द झाल्याचा मेसेज आलेल्या नीला अशोक जोशी यांनी व्यक्त केलं आहे. महापालिकेकडून मात्र जो खुलासा करण्यात आला त्यानुसार कोविशील्डचा साठा संपल्याने आता त्या व्यक्तींसाठी नवीन नोंदणी करावी लागणार आहे. ज्यांनी कोणी या लशीसाठी नोंदणी केलेली होती त्या सगळ्यांच्या अपॉइंटमेंट रद्द होऊन त्यांना नवीन नोंदणी केल्यानंतर लस देण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: