पुण्यातून आनंदाची बातमी, कोरोनाग्रस्त दाम्पत्याची उपचारानंतर पहिली टेस्ट निगेटिव्ह

पुण्यातून आनंदाची बातमी, कोरोनाग्रस्त दाम्पत्याची उपचारानंतर पहिली टेस्ट निगेटिव्ह

दोन आठवड्यापूर्वी पुण्यात एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आता त्याच दाम्पत्यावर उपचारानंतर पहिली टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती पुणे पालिका आयुक्तांनी दिली.

  • Share this:

पुणे, 23 मार्च : भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना महाराष्ट्रातून पहिली आनंदाची बातमी आली आहे. पुण्यात 9 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले दाम्पत्य आता पूर्ण बरे झाल्याची माहीती पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या 14 दिवसांपासून त्या दाम्पत्यावर उपचार सुरु होते. त्यांनंतर आता केलेली प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. संबंधित दाम्पत्यानंतर आणखी तिघांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. 9 मार्चला ही बातमी समोर आल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रोखण्यासाठी नाईलाजास्तव असा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

हे वाचा : चंद्रपुरातील क्वारंटाइनच्या हातावर जीपीएस बेल्ट, जिल्हा प्रशासनाचा जालीम उपाय

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत  24 ने वाढ झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 97 वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यानं महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाच्या भीतीने गेल्या आठवड्यापासून पुण्यात अघोषित लॉकडाउनचं चित्र होतं.

हे वाचा : कोरोनाचा असाही धसका, गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर भलंमोठं झाड टाकून बंद केला रस्ता!

First published: March 23, 2020, 9:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading