जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाचा असाही धसका, गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर भलंमोठं झाड टाकून बंद केला रस्ता!

कोरोनाचा असाही धसका, गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर भलंमोठं झाड टाकून बंद केला रस्ता!

कोरोनाचा असाही धसका, गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर भलंमोठं झाड टाकून बंद केला रस्ता!

गावकऱ्यांनी शहरी भागातील नागरिक आपल्या गावात येऊ नयेत यासाठी गावात येणाऱ्या रस्त्याचं बंद केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भीमाशंकर, 23 मार्च : कोरोनाचा धसका जसा शहरी नागरिकानी घेतला आहे, तसाच ग्रामीण भागातील नागरिकांनीही घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरातील आहुपे या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या निसर्गरम्य गावातील गावकऱ्यांनी शहरी भागातील नागरिक आपल्या गावात येऊ नयेत यासाठी गावात येणाऱ्या रस्त्याचं बंद केला आहे. गावकऱ्यांनी रस्त्यावर भलंमोठं एक झाडं आडवं टाकलं आहे. प्रवेश बंद, असा मजकूर त्यावर टाकला आहे. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कलम 144 प्रमाणे जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरी देखील शहरी भागातील नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य आहे की असाच प्रश्न आता निर्माण झाला असून शहरी भागातील नागरिक अद्यापही मोठ्या प्रमाणात महामार्गावर चौकांमध्ये गर्दी करत आहेत. हेही वाचा- उद्धव ठाकरेंनी घेतला कठोर निर्णय; राज्यात कर्फ्यू लागू, रस्त्यावर फिरणं बंद त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी ही आता कोरोनाचा चांगलाच धसका घेतल्याचं यामधून दिसत आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील आहुपे या गावाने गावाबाहेरील कोणताही नागरिक गावात येऊ नये यासाठी गावात येणारा रस्ताच अडवला असून रस्त्यावर भलमोठं झाड टाकून रस्ताच बंद केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ज्या पद्धतीने कोरोनाचे गांभीर्य आहे, तशाच पद्धतीने शहरातील नागरिकांनी ही कोरोनाबाबत सतर्क होऊन विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि स्वतःची काळजी स्वतः घेवून स्व:ताही सुरक्षित राहून इतरांनाही सुरक्षित ठेवावे, अशा भावना गावकरी व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात