Home /News /pune /

Coronavirus latest updates: पुण्यात कोरोना बळींचा आकडा 5 हजारपार; नागपुरातही कहर! एका दिवसात राज्याने मोडलं सप्टेंबरचं टोक

Coronavirus latest updates: पुण्यात कोरोना बळींचा आकडा 5 हजारपार; नागपुरातही कहर! एका दिवसात राज्याने मोडलं सप्टेंबरचं टोक

सर्व देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आला कमी होत आहे. सलग गेल्या महिनाभरापासून आलेख उतरणीला लागला आहे.

सर्व देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आला कमी होत आहे. सलग गेल्या महिनाभरापासून आलेख उतरणीला लागला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाव्हायरचं थैमान (Coronavirus peak in maharashtra) महाराष्ट्राने अनुभवलं होतं. आताची परिस्थिती त्याहीपेक्षा भीषण म्हणावी लागेल. पाहा latest corona updates.

    पुणे/नागपूर, 18 मार्च: गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाव्हायरचं थैमान (Coronavirus peak in maharashtra) महाराष्ट्राने अनुभवलं होतं. दररोज हादरवणारे आकडे आणि मृत्यूंचं थैमान महाराष्ट्र पाहात होता. त्यानंतर हळूहळी दररोज नव्याने सापडणाऱ्या कोरोनारुग्णांचा आकडा (Covid-19 maharashtra) कमी कमी होत गेला. कोरोनावर मात केल्याच्या बातम्याही झाल्या आणि आता मात्र फेब्रुवारीपासून कोरोनारुग्णांच्या आकड्यांचा आलेख पुन्हा झराझर वर चढतो आहे. गुरुवारी या संख्येने कहर केला आणि महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही मागे टाकलं. गेल्या 24 तासांत राज्यात 25833 नवे रुग्ण सापडले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या (Coronavirus pune data) आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत एकट्या पुणे शहरातच 2752 नव्या रुग्णांंची भर पडली आहे तर 28 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात कोरोनाबळींच्या संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत या साथीने शहरात 5002 जणांचा बळी घेतला आहे.  राज्यात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus in maharashtra) दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतो आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांच्या वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची धक्कादायक अशी आकडेवारी जारी केली आहे. गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हे आहेत. त्यातही पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. Corona Vaccine:'या' राज्यात आता18 ते 45 वयोगटातील व्यक्तींनाही मिळणार कोरोना लस! पुण्यात तब्बल 35539 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. ही संख्या कमी होण्याऐवजी दररोज वाढतच आहे. नागपूरमध्ये कहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक धक्का विदर्भाला बसला आहे. नागपुरात नव्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. एकाच दिवसात 3 हजारांच्या जवळ नवे कोरोना रुग्ण शहरात सापडले असल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाउनसारखे कडक निर्बंध असूनही नागपूरची कोरोना स्थिती अद्याप आटोक्यात आलेली नाही. केंद्र सरकारनेदेखील यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे.
    First published:

    Tags: Coronavirus, Pune

    पुढील बातम्या