Home /News /coronavirus-latest-news /

'या' राज्यात आता 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींनाही मिळणार कोरोना लस! प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न

'या' राज्यात आता 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींनाही मिळणार कोरोना लस! प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न

केंद्राला पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात म्हटलं आहे, की 18 ते 45 या वयोगटातील युवकांनादेखील लस (Corona Vaccine) देण्यास परवानगी द्यायला हवी. कारण रंगपंचमीच्यावेळी कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases) वाढ होण्याची शक्यता आहे.

    लखनऊ 18 मार्च : महिन्याच्या शेवटी येणाऱ्या रंगपंचमीच्यावेळी कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases) वाढ होण्याची शक्यता उत्तर प्रदेश सरकारनं वर्तवली आहे. या कारणामुळं 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांना लसीकरण (Corona Vaccine) करण्याची योजना सरकार आखत आहे. योगी सरकार याप्रकरणी परवानगीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह म्हणाले, की कोरोना महामारी रोखण्यासाठी राज्यानं योग्य प्रकारे खबरदारी घेत प्रसार रोखण्याचं काम केलं. यामुळे राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आणि मृत्यूदर कमी आहे. केंद्राला पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात म्हटलं आहे, की 18 ते 45 या वयोगटातील युवकांनादेखील लस देण्यास परवानगी द्यायला पाहिजे. विशेषतः ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्या आहेत. तसंच काही आजारांनी ग्रासलेल्यांनाही लस देण्यात यायला हवी. याशिवाय सरकार शिक्षक आणि बँक कर्मचाऱ्यांनाही लसीकरणात सामील करण्याचा विचार करत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला राज्यातील 22.79 कोटी लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकांना लस द्यावी लागणार आहे. म्हणजेच जवळपास 6.8 कोटी नागरिक. राज्यात आतापर्यंत तब्बल 34 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. ही संख्या ठरवलेल्या उद्दिष्टाच्या ५ टक्के आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत तब्बल 6 लाख 5 हजार 915 जणांना कोरोनाची लागण (Coronavirus in UP) झाली आहे. तर, 8751 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 5 लाख 95 हजार 150 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 2014 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, UP, Vaccinated for covid 19

    पुढील बातम्या