मुंबई, 18 ऑगस्ट : Coronavirus वर अद्यापही रामबाण औषध नाही. लशीचासुद्धा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे अधिकाधिक covid चाचण्या करून लवकरात लवकर संशयित रुग्णांना क्वारंटाईन करायचं हाच कोरोनाचा फैलाव रोखण्याचा सर्वमान्य उपाय समजला जातो. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चाचण्यांची संख्या वाढवण्याची वेळोवेळी मागणी झाली. काही जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये चाचण्या वाढल्याही. पण आता ताजी आकडेवारी पाहता पुण्यात (pune) सर्वाधिक चाचण्या होत आहेत. मुंबईच्या (Mumbai)दीडपट चाचण्या पुण्यात होत आहेत.
मुंबईत संसर्गाचा वेग सर्वात कमी झाल्याचा दावा केला जात आहे, पण चाचण्यांची संख्याही तुलनेने कमी आहे. दर दहा लाख म्हणजे एक मिलीयन लोकसंख्येमागे मुंबईत फक्त 619 चाचण्या होत आहेत. पुण्यातच हेच प्रमाण सध्या 955 वर गेलं आहे. इतर प्रगत देशांच्या तुलनेत हे प्रमाणसुद्धा कमीच आहे.
पुण्यात आणि मुंबईत किती चाचण्या होत आहेत?
पुणे :
दिवसाला सरासरी 11 हजार टेस्ट
प्रति दहा लाख टेस्ट - 955
पॉझिटिव्हिटी रेट - 21.87 टक्के
मुंबई -
दिवसाला सरासरी 8 हजार टेस्ट
प्रति दहा लाख टेस्ट - 619
पॉझिटिव्हिटी रेट - 21.05 टक्के
पुणे (Pune coronavirus) शहरातील जवळपास 65% लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज सापडल्या आहेत.
सर्वेक्षणानुसार सरासरी सरासरी 45 ते 50 टक्के लोकसंख्येत अँटिबॉडीज आढळून आल्यात. म्हणजे पुणे हर्ड इम्युनिटीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलं आहे. 50 ते 70 टक्के अँटीबॉडीत आढळल्या तर पूर्ण हर्ड इम्युनिटी प्राप्त होते.
हे वाचा - पुण्यात कोरोनाचा कम्युनिटी प्रसार? 65% लोकांमध्ये सापडल्या अँटिबॉडीज
17 ऑगस्टच्या राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण 6,04,358 रुग्णांपैकी मुंबईत 1,29479 तर पुण्यात 1,32481 कोरोना रुग्ण आहेत. पुण्यातील एकूण रुग्णांपैकी 39424 अॅक्टिव्ह पेशंट्स आहेत. म्हणजे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात देशभरातले सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पण त्याचबरोबर कदाचित पुण्यातच देशभरातल्या सर्वाधिक दैनंदिन चाचण्याही होत आहेत.
हर्ड इम्युनिटी म्हणजे जास्ती जास्त लोकांना व्हायरसची लागण होऊन त्यांच्यामध्ये व्हायरसविरोधी सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणे आणि पुण्यातील सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार पुणे आता या हर्ड इम्युनिटीच्या जवळ पोहोचलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus