पुण्याचा तरुण दुबई विमानतळावर अडकला, झोप लागल्यामुळे सुटलं शेवटचं विमान

पुण्याचा तरुण दुबई विमानतळावर अडकला, झोप लागल्यामुळे सुटलं शेवटचं विमान

आता या तरुणाला दुबईमध्येही जाण्यास परवानगी दिलेली नाही. कारण यूएईने कोरोना रोखण्यासाठी निवासाचा व्हिसाधारकांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.

  • Share this:

दुबई, 25 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे एक भारतीय तरुण संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्येच अडकला आहे. कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेत तरुणाला मायदेशी परत यायचं होतं. पण दुबईच्या विमानतळावरून भारतात येणारं शेवटचं उड्डाण सुटलं. त्यामुळे हा तरुण आता दुबईतच अडकला आहे. ते झालं असं की आता या तरुणाला दुबईमध्येही जाण्यास परवानगी दिलेली नाही. कारण यूएईने कोरोना रोखण्यासाठी निवासाचा व्हिसाधारकांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.

हे वाचा - कोरोनाच्या लढाईत माणुसकीची परीक्षा; 6 वर्षाच्या मुलाचा अंत्यविधी रोखला, अखेर...

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणसिंग असं परदेशी अडकलेल्या तरुणाचं नाव आहे. तो महाराष्ट्रातील पुण्यातील राहणारा आहे. 22 मार्च रोजी दुबई विमानतळावर आले. तेथून अहमदाबादसाठी सकाळी 4 वाजता अॅमिरेट्स एअरलाइनच्या विमानात बसणार होते. पण अरुणसिंग वेळेआधीच विमानतळावर पोहोचले. त्यामुळे वेटिंगरुममध्ये त्यांना झोप लागली. गाढ झोप लागल्यामुळे शेवटचा बोर्डिंग कॉल मिस झाला.

अरूण यांना यूएईमध्येही पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ते दुबईच्या विमानतळावरच अडकले आहेत. अरूण हे एका आयटी बँकेत काम करतात. खूप तणावात असल्यामुळे त्यांना अचानक झोप लागली. ही त्यांची खूप मोठी चूक झाल्याचं अरूण म्हणाले. अरूण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते घटस्फोट घेण्यासाठी भारतात येत होते.

हे वाचा - पुढच्या 21 दिवसांमध्ये काय राहणार सुरू आणि कशावर आहे बंदी? जाणून घ्या

अरूण यांना त्यांच्या पत्नीकडून घटस्फोट हवा आहे. यासंबंधी याचिका दाखल करण्यासाठी भारतात येत होते. पण त्यांना झोप लागली आणि शेवटचं उड्डाण निघून गेलं. सुरुवातीला त्यांना इमिग्रेशन हॉलमध्ये परत जाण्याची परवानगी दिली गेली. मात्र तेव्हा प्रवेश केवळ जीसीसी (आखात सहकार्य परिषद) रहिवाशांसाठी होता अशी माहिती अरूण यांनी माध्यमांना दिली आहे.

हे वाचा - महत्त्वाची घोषणा, रेल्वे मंत्रालयानेही वाढवला लॉकडाउन, 14 एप्रिलपर्यंत बंद!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2020 10:04 AM IST

ताज्या बातम्या