महत्त्वाची घोषणा, रेल्वे मंत्रालयानेही वाढवला लॉकडाउन, 14 एप्रिलपर्यंत बंद!

महत्त्वाची घोषणा, रेल्वे मंत्रालयानेही वाढवला लॉकडाउन, 14 एप्रिलपर्यंत बंद!

याआधी रेल्वे प्रशासनाने 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत मालगाड्या वगळता सर्व पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनानंही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

याआधी रेल्वे प्रशासनाने 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत मालगाड्या वगळता सर्व पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यात उपनगरातील रेल्वेचाही समावेश होता. याच दरम्यान भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी मार्फत ज्या लोकांनी तिकीटं बूक केली आहे. त्या सर्वांचे पैसे  परत देण्याचे आदेश देण्यात आले आहे.  ज्या प्रवाशांनी ऑनलाइन रेल्वेची तिकीटं बूक केली आहे. अशा सर्व प्रवाशांचे पैसे हे परत दिले जाणार आहे.

हेही वाचा -पुढच्या 21 दिवसांमध्ये काय राहणार सुरू आणि कशावर आहे बंदी? जाणून घ्या

जीवनावश्यक  वस्तूंसाठी सुरू राहणार रेल्वे

भारतीय रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, कोरोना व्हायरसमुळे रेल्वे सेवा रद्द करावी लागली आहे. परंतु, लोकांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा सुरूच राहणार आहे. त्यासाठी मालगाडी सेवा सुरूच राहणार आहे.  23 मार्च रोजी धान्य, मीठ, खाद्य तेल, साखर, दूध,फळं आणि भाजीपाला, कोळसा आणि  पेट्रोलियम उत्पादानाचे  474 रॅक तयार केले आहे.

हेही वाचा -लॉकडाऊन दरम्यान सरकारचं काम कसं सुरू राहणार? हा आहे मोदींचा प्लान 'बी'

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून सर्व रेल्वे गाड्यांचं निर्जंतुकीरण करण्यात येत आहे. लोकांनी लॉकडाउनचं पालन केलं पाहिजे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

First published: March 25, 2020, 9:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या