कोरोनाच्या लढाईत माणुसकीची परीक्षा; 6 वर्षाच्या मुलाचा अंत्यविधी रोखला, अखेर...

कोरोनाच्या लढाईत माणुसकीची परीक्षा; 6 वर्षाच्या मुलाचा अंत्यविधी रोखला, अखेर...

उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी या मुलाचे निधन झाले. निधनानंतर त्याच्यावर कासारी इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र,

  • Share this:

बीड, 25 मार्च : बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी इथे एका सहा वर्षीय मुलाचा अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी कोरोना संशयित समजून रोखल्याची घटना काल घडली आहे. आज सकाळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. आरोग्य प्रशासनानं याबाबत ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर मुलावर अंत्यविधी करण्यात आला. खरंतर कोरोना म्हणजे एक माणुसकीची लढाई आहे असंच म्हणावं लागेल.

कासारी इथल्या एका मुलाला हृदयविकार होता. मुंबई इथल्या जे. जे. रुग्णालयात एक महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी या मुलाचे निधन झाले. निधनानंतर त्याच्यावर कासारी इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, ग्रामस्थांत कोरोनाच्या भीतीने अस्वस्थता पसरली. ग्रामस्थांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध दर्शवला.

हे वाचा - पुढच्या 21 दिवसांमध्ये काय राहणार सुरू आणि कशावर आहे बंदी? जाणून घ्या

याबाबत ग्रामसेविका अनुचंदना थोरात यांनी प्रशासनास याबाबत माहिती दिली. आरोग्य विभागातर्फे भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती लगड यांनी कासारी इथे जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली. यानंतर या मृत मुलावर मंगळवारी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्यामुळे लोकांची माणुसकी हरवली आणि लोक अफवांवर जास्त विश्वास ठेवायला लागले असं दिसतं.

खरंतर कोरोनासारख्या आजारामुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणं आणि नियमांप्रमाणे घरातच राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. लोकांनी काळजी घ्या पण भीती बाळगण्यात काही अर्थ नाही अशा सुचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

हे वाचा - इटलीमध्ये कोरोनामुळे 743 जणांच्या मृत्यूचा रेकॉर्ड, जगातील 2.6 अब्ज लोक लॉकडाऊन

 

First published: March 25, 2020, 9:26 AM IST

ताज्या बातम्या