मराठी बातम्या /बातम्या /पुणे /महाराष्ट्रात पुन्हा एकदा Corona रुग्णांमध्ये मोठी वाढ; 24 तासांत 9895 नवे रुग्ण

महाराष्ट्रात पुन्हा एकदा Corona रुग्णांमध्ये मोठी वाढ; 24 तासांत 9895 नवे रुग्ण

बुधवारी पुण्यात 3 हजार 581 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

बुधवारी पुण्यात 3 हजार 581 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus maharashtra updates) उद्रेक सुरूच आहे.

मुंबई, 23 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus maharashtra updates) उद्रेक सुरूच आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 9895 कोरोनारुग्णांचं निदान झालं. कालही दहा हजारांवर नव्या कोरोनारुग्णांचं निदान झालं होतं. 24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा कालचा पहिलाच दिवस होता. आजही मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाल्याने राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 47 502 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,556 वर गेला आहे. दिवसभरात 298 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता कोरोनाबळींची संख्याही 12854 झाली आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,40,092 रुग्ण आहेत.

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 6484 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं.

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्ष पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,94,253 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

21 जुलै पर्यंतची आकडेवारी

अॅक्टिव्ह रुग्ण - 1,36,980

24 तासांतली वाढ - 10576

बरे झालेले रुग्ण - 1,87,769

एकूण मृत्यू -12,556

एकूण रुग्ण - 3,37,607

पाहा - पुणं झालं Corona Hotspot : देशात सर्वाधिक नवे रुग्ण असलेल्या जिल्ह्यातलं चित्र

सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्याला पुण्याने या बाबतीत मागे टाकलं आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. एकूण रुग्णसंख्या मुंबईत अधिक असली तरी नवे रुग्ण कमी झाले आहेत आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाणही मुंबईत मोठं आहे. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक Coronavirus चे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार

पुणे 41357

ठाणे 36857

मुंबई 22598

रायगड 5481

पालघर 5462

या पाच जिल्ह्यांनंतर नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा क्रमाक लागतो.

पुणे शहरात लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसांत तब्बल 14109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)