राज्यातला पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडला होता. आता पुन्हा एकदा पुणे शहर आणि जिल्हा राज्यातच नाही तर देशभरातला चिंताजनक हॉटस्पॉट ठरला आहे.
Unlock नंतर पुण्यात Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. एक आठवड्याच्या कडक लॉकडाऊननंतही रुग्णवाढ कमी झालेली नाही.
पुण्यात सात ते आठ दवाखाने फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका रुग्णाने काल रात्री कुटुंब आणि मित्रांसह अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं होतं. त्या रुग्णांचा आज दुर्दैवाने मृत्यू झाला.
22 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 42466 झाली आहे. 24 तासांतच 1751 रुग्णांची वाढ झाली आहे.
22 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात 24 तासांत 39 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. 609 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 94 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
मुंबई आणि त्यानंतर कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या ठाणे जिल्ह्यापेक्षाही पुण्याची रुग्णवाढ जास्त आहे. सध्या सर्वाधित अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यातच आहेत.
आठवडाभर कडक लॉकडाऊन असूनही सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे. त्यापैकी शहरात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 16269 आहे. आतापर्यंत एकूण 1068 कोरोना बळी शहरात गेले आहेत.
22 जुलैच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असून त्यांची संख्या 39353 आहे. त्याखालोखाल ठाण्यात 36180 रुग्ण आहेत.
मुंबईत घरोघरी जाऊन केलेल्या स्क्रीनिंगमुळे आणि क्वारंटाईन केल्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्यूदरही आटोक्यात आला आहे.