नाशिक, 6 एप्रिल : महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या संकाटाने चिंता निर्माण झाली असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्य भांडणात सख्ख्या चुलत भावाने बहिणीला जीवघेणी मारहाण केली. या मारहाणीत बहिणीचा मृत्यू झाला आहे.
नाशिकमध्ये सख्ख्या चुलत भावंडांमध्ये पाणी वाटपावरून वाद झाले. या वादाचं नंतर मात्र थेट मारहाणीत रूपांतर झालं. यातच रागाच्या भरात भावाने बहिणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत दुखापतग्रस्त झालेल्या युवतीचा रुग्णालयात झाला मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या भावावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, नाशिकमध्ये संचारबंदीमुळे एकाचा बळी गेला आहे. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. संचारबंदीमुळे पोलिसांनी लावलेल्या रोधकाला मोटरसायकल धडकली. यात सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली पत्नी जबर जखमी झाली आहे.
हेही वाचा-कोरोनासारख्या गंभीर संकटातही कुटुंबातील व्यक्तीला अखेरचा निरोप देताना घडली चूक, 52 जणांविरोधात गुन्हा दाखल
संचारबंदी सुरू असताना पंचवटी भागात पोलिसांनी दोरी आणी बांबू लावून रस्ता बंद केला होता. हा रोधक लक्ष्यात न आल्यानं अपघात घडल्याची माहिती आहे. मात्र या धक्कादायक घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.