पुणे, 28 जुलै : कोरोना महामारीचं थैमान देशात आणि जगात सुरू असतानाच एक महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना पुण्यात घडली आहे. बाळाला आईच्या गर्भात असतानाच करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही देशातील पहिलीच घटना आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आईच्या गर्भात नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशाचा रिकव्हरी रेट वाढला! तर 24 तासांत 47 हजार रुग्णांची नोंद कोरोनाबाधित प्रकरणांमध्ये बऱ्याच वेळा आईला कोरोनाची लागण होते, त्यामुळे बाळाला कोरोनाची लागण होण्याची भीती असते. राज्यात बाळाला प्रसूतीनंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गर्भात असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिली घटना असल्याचं ससूनच्या अधिष्ठातांनी म्हटलं आहे. या गर्भवती महिलेल्या प्रसूती होण्याच्या एका दिवसाआधी ताप आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, या महिलेचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला. अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत असलेल्या ओझर विघ्नहर गणपती मंदिरात चोरी परंतु, बाळाच्या आईची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी तिच्या शरीरात अँन्टीबॉडीज आढळून आल्यात याचाच अर्थ या बाळाच्या आईला कोरोना यापूर्वीच होऊन गेला असावा, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यानंतर या बाळाला रुग्णालयात निगराणी खाली ठेवण्यात आले होते. 5 दिवसांनी उपचारकरून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 72896 वर दरम्यान, पुण्यात एका रात्रीत तब्बल 114 रुग्ण वाढले आहेत. हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, पुण्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता 72896 झाली आहे तर आतापर्यंत 1737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ‘मेड इन इंडिया’ कोव्हॅक्सिन लस नागपूरमध्ये तिघांना दिली, रिपोर्ट आले नॉर्मल! दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुण्यात मोठी वाढ होत आहे. 20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाखांवर जाऊ शकते, त्यापैकी 48 हजार पेशंट्स अॅक्टिव्ह असू शकतात, असा अंदाज पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. 31 जुलैपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 60 हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यापैकी 27 हजार पेशंट्स अॅक्टिव्ह असू शकतात. सध्याच्या रूग्णवाढीनुसार पुणे मनपाने हा अंदाज व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.