धक्कादायक, अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत असलेल्या ओझर विघ्नहर गणपती मंदिरात चोरी

धक्कादायक, अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत असलेल्या ओझर विघ्नहर गणपती मंदिरात चोरी

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नहर हा सातवा गणपती आहे. विघ्नहर म्हणजे भक्तांचे विघ्न दूर करणारा अशी या गणरायाची ओळख आहे

  • Share this:

जुन्नर, 28 जुलै : महाराष्ट्रासह देशभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती मंदिरातून चांदीची छत्री आणि दानपेटी चोरीला गेली आहे.

अष्टविनायक गणपती  तिर्थक्षेत्र  असलेल्या ओझर येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या मस्तकावरील सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी चोरून नेली आहे. आज पहाटे 2 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले  आले. याबाबत विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार,  तोंड झाकलेले दोन चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. साधारण दोन किलो वजनाच्या चांदीत घडवलेली सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर गाभाऱ्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी, एक दानपेटी फोडून ही दानपेटी मंदिराजवळील नदीपात्र परिसरात फेकून दिल्याची फिर्याद देवस्थान ट्रस्टच्या वतीने ओझर पोलिसांकडे देण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात तिजोरीतील रकमेची मोजदाद करण्यात आली होती आणि त्यानंतर लॅाकडाउनमुळे मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरता बंद असल्याने दानपेटीत फारशी रक्कम नसावी अशी शक्यता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी.व्ही. मांडे यांनी व्यक्त केली.

'मेड इन इंडिया' कोव्हॅक्सिन लस नागपूरमध्ये तिघांना दिली, रिपोर्ट आले नॉर्मल!

चोरीच्या घटनेची माहिती कळताच जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना,ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे आणि पथकाने मंदिरात भेट देऊन परिसरातील पाहणी केली. मंदिराच्या भोवती असलेल्या दगडी कुंपणावरून चढून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला असावा अशी शक्यता कांबळे यांनी व्यक्त केली.

दीड वर्षांपूर्वी देखील या मंदिरात चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. सध्या कोरोना आपत्ती काळात मंदिर बंद असल्याने चोरट्यांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा कयास आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नहर हा सातवा गणपती आहे. विघ्नहर म्हणजे भक्तांचे विघ्न दूर करणारा अशी या गणरायाची ओळख आहे. तसंच अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नहरला ओळखले जाते. विशेष, ओझरच्या या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी केली असून बांधकाम केलेले आहे. कुकुडी नदीच्या तीरावर हे  मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. त्यामुळे चोरीची घटना नेमकी घडली कशी? याचा पोलीस शोध घेत आहे.

Published by: sachin Salve
First published: July 28, 2020, 11:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या