कोरोना अपडेट : इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका, 58 नागरिकांना घेऊन 'ग्लोबमास्टर' देशात परतलं

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) इराणमध्ये (Iran) अडकलेल्या 58 भारतीयांना (Indian) भारतात (India) आणण्यात आलं आहे.

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) इराणमध्ये (Iran) अडकलेल्या 58 भारतीयांना (Indian) भारतात (India) आणण्यात आलं आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 मार्च :  इराणमध्ये (Iran) अडकलेल्या भारतीयांना (Indian) भारतात (India) आणण्यात आलं आहे. एअरफोर्सच्या विमानानं हे भारतीय देशात आलेत. या भारतीयांना आणण्यासाठी सी-17 ग्लोबमास्टर (C-17 Globemaster)   विमान पाठवण्यात आलं होतं. इराणमधील कोरोनाव्हायरसच्या प्रकोपामुळे काही भारतीय तिथं अडकले. या भारतीयांना आणण्यासाठी सोमवारी एअरफोर्सचं सी-17 ग्लोबमास्टर विमान पाठवण्यात आलं.  इराणमधील भारतीयांच्या पहिल्या बॅचला घेऊन हे विमान भारतात आलं आहे. यामध्ये 58 भारतीय भाविकांचा समावेश आहे. गाझियाबादमधील हिंडन एअरफोर्स स्टेशनवर हे विमान उतरलं. यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणमधील भारतीय दूतावासाचे आभार मानलते. संबंधित - मेट्रो, एसी बसमधून प्रवास करताय सावधान ! तुम्हाला होऊ शकतो 'कोरोना' आता इराणमधील इतर भारतीयांनाही परत आणण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं. इराणमधून भारतात आलेल्या या नागरिकांची कोरोनाव्हायरसची चाचणी करण्यात आली. यापैकी एकालाही कोरोनाव्हायरसची लागण झाली नसल्याचं चाचणी स्पष्ट झालं आहे. तरीदेखील खबरदारी म्हणून या सर्वांना 14 दिवस वेगळं ठेवलं जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. जगभरात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 4,011 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण 1,10,000 प्रकरणं आहेत. तब्बल 100 देशांमध्ये हा महाभयंकर व्हायरस पसरला आहे. भारतात कोरोनाग्रस्त एकूण 47 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 2 पुण्यातील आहेत, तर केरळमधील सुरुवातीच्या 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. संबंधित - जगातील सर्वात हेल्दी देशही 'कोरोना'च्या विळख्यात, व्हायरसमुळे झाले बेजार
    First published: