मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Coronavirus : देशात कोरोनाचा कहर वाढू नये म्हणून तज्ज्ञांनी केल्या गंभीर सूचना, Video

Coronavirus : देशात कोरोनाचा कहर वाढू नये म्हणून तज्ज्ञांनी केल्या गंभीर सूचना, Video

X
Coronavirus

Coronavirus in India : कोरोनाचा कहर वाढू नये यासाठी तज्ज्ञांनी सूचना केल्या आहेत.

Coronavirus in India : कोरोनाचा कहर वाढू नये यासाठी तज्ज्ञांनी सूचना केल्या आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune, India

    पुणे, 22 डिसेंबर : संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 5 रुग्ण भारतातही सापडलेत. याच पार्श्वभूमीवर आयएमएचे माजी अध्यक्ष आणि तज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी कोरोनाचा कहर वाढू नये यासाठी सूचना केल्या आहेत.

    चौथा डोस देण्याची गरज निर्माण?

    जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला असून तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची चिंता वाढली आहे. भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर प्रतिबंधक उपाय योजना सुरू कराव्या तसेच आत्ता पुन्हा चौथा डोस देण्याची गरज निर्माण झाली आहे, असं अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे.

    corona virus lockdown : देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? कोरोनाने वाढवली चिंता, केंद्र सरकार सतर्क

    पूर्णपणे विचार करूनच लॉकडाऊनचा विचार करावा

    कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता सरकारने ज्या ज्या देशात या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या त्या देशातील प्रवाशांची चौकशी तसेच कोरोनावरील प्रतिबंधक उपाय योजना सुरू कराव्यात. तसेच लसीकरणावर जोर देत पुन्हा एकदा ज्यांचे ज्यांचे लसीकरण राहिले आहे. त्यांचे लसीकरण करावे. सध्याची परिस्थिती पाहता जर भारतात कोरोना वाढत गेला तर जस मागच्या वेळेस घाई गडबडीत लॉकडाऊन करण्यात आलं होत. तसं न करता पूर्णपणे विचार करूनच लॉकडाऊनचा विचार करावा, असं अविनाश भोंडवे सांगतात.

     विशेष पद्धतीने चेकिंग केले पाहिजे

    भोंडवे यांनी पुढे सांगितले की, प्रशासनाने नागरिकांना पुढील बूस्टर डोससाठी तयार केले पाहिजे. यासोबतच कोरोना पासून वाचण्यासाठी लागणारे पीपी किट तसेच इतर वैद्यकीय साधन संपत्ती आत्ताच तयार करून ठेवणे गरजेचे आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांना विशेष पद्धतीने चेकिंग केले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे पुन्हा एकदा भारतामध्ये कोरोना पसरू शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Corona, Corona updates, Corona virus in india, Local18, Pune