Coronavirus बाबत जागतिक स्तरावर भारताची नेमकी काय आहे परिस्थिती?

Coronavirus बाबत जागतिक स्तरावर भारताची नेमकी काय आहे परिस्थिती?

10 लाखांपेक्षा अधिक Corona test करणाऱ्या जगातील इतर 5 देशांशी भारताची (India) तुलना करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे : भारतात (India) कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांची संख्या 40 हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. तर 1301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा हा वाढता आकडा पाहून अधिक भीती निर्माण झाली आहे. मात्र कोरोनाव्हायरसबाबत जगात भारताची परिस्थिती पाहता दिलासा मिळेल. विकसित देशांच्या तुलनेतही भारतात कोरोनाव्हायरसची परिस्थिती नियंत्रणात आहे.

भारतात रविवारपर्यंत कोरोनाव्हायरसच्या 10 लाखांपेक्षा जास्त टेस्ट झाल्यात. 10 लाख टेस्ट करणाऱ्या जगातील इतर 5 देशांशी भारताची तुलना केली तर भारताची स्थिती खूपच चांगली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.

10 लाख टेस्ट केल्यानंतर कोरोनाची प्रकरणं

भारतात कोरोना रुग्णांची संख्या  39,980 आहेत तर दुसरीकडे अमेरिकेत 1,64,620, जर्मनीत 73,522, स्पेनमध्ये 2,00,194, तुर्कीत 1,17,589 आणि इटलीत 1,52,271 प्रकरणं आहेत.

भारतात मृत्यूदरही कमी

भारतासाठी आणखी एक चांगली बातमी म्हणजे भारतात मृत्यूदरही कमी आहे. दक्षिण कोरिया, चीन, रशिया आणि अमेरिकेपेक्षा भारतात कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृतांची संख्या कमी आहे. भारतातील कोरोनाचा मृत्यूदर फक्त 3.2 टक्के आहे.

हे वाचा - Coronavirus ला रोखण्यासाठी जगातील 70% लोकांना संक्रमित व्हावं लागेल'

याचा अर्थ 100 कोरोना रुग्णांपैकी 4 पेक्षाही कमी रुग्णांचा मृत्यू होतो आहे. लोकसंख्येच्या दृष्टिने ही आकडेवारी पाहिली तर फक्त एक लाख लोकांपैकी फक्त 0.09 लोकांचा मृत्यू होतो आहे.

दक्षिण कोरियालाही मागे टाकलं

कोरोना संक्रमण रोखण्यात सर्वत्र दक्षिण कोरियाचं कौतुक होतं आहे. मात्र मृत्यूदरात भारताने दक्षिण कोरियालाहगी मागे टाकलं आहे. दक्षिण कोरियात आतापर्यंत 10780 कोरोना रुग्णांपैकी 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ इथला मृत्यूदर 2.3 टक्के आहे. मात्र एक लाख लोकसंख्येमागे 0.48 टक्के मृत्यू होत आहेत.

हे वाचा - Vitamin D च्या कमतरतेमुळे कोरोनाव्हायरसचा धोका, संशोधनात समोर आली बाब

भारतानंतर चीनमध्ये सर्वात कमी मृत्यूदर आहे. चीनमध्ये 83959 प्रकरणांपैकी 5.5 टक्के लोकांचा मृत्यू होतो आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने हा आकडा 0.33 टक्के आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 3, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या