मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातल्या Corona Vaccination संदर्भातली मोठी अपडेट, तीन दिवस बंद असेल लसीकरण

पुण्यातल्या Corona Vaccination संदर्भातली मोठी अपडेट, तीन दिवस बंद असेल लसीकरण

पुण्यातील (vaccination in Pune)  लसीकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.

पुण्यातील (vaccination in Pune) लसीकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.

पुण्यातील (vaccination in Pune) लसीकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.

पुणे, 03 नोव्हेंबर: पुण्यातील (vaccination in Pune) लसीकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्यातील कोरोना लसीकरण (Corona vaccination) तीन दिवस बंद (closed for three days) असणार आहे. पुण्यातल्या सरकारी रुग्णालयामध्ये (government hospital) उद्यापासून तीन दिवस म्हणजेच गुरुवार, शनिवार आणि रविवारी लसीकरण बंद असेल. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सत्रात फक्त लसीकरण करता येणार आहे.

पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी माहिती दिली की, सरकारी रुग्णालयांमधून सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण दिवाळीमध्ये तीन दिवस बंद राहणार आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरू राहील.

हेही वाचा- T20 World Cup: बाबर- रिझवाननं एकाच मॅचमध्ये बनवले अनेक रेकॉर्ड्स, विराट-रोहित पडले मागं

दिवाळी सणात लसीकरणासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. पुण्यात 18 वर्षांवरील 100 टक्के पुणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आता लसीचा दुसरा डोस नागरिकांनी घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र, दिवाळीमुळे केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्याने केंद्रावर लसीकरण होणार नाही. शुक्रवारी सकाळच्या सत्रात हे लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार आहेत. त्यानंतर येत्या शनिवारी आणि रविवारी देखील केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचं डॉ. सूर्यकांत देवकर यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- High Alert! या 9 राज्यात डेंग्यूचा प्रकोप, आरोग्य मंत्रालयानं उचललं मोठं पाऊल

राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण करा: मुख्यमंत्री

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत कोविड 19 संसर्ग प्रतिबंध लसीकरणा संदर्भात प्रदिर्घ चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत 100 % लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट दिलंय. त्यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवला जाणार आहे. त्यासाठी आता घरोघरी जाऊनही लसीकरण मोहीम राबवण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine