मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: बाबर- रिझवाननं एकाच मॅचमध्ये बनवले अनेक रेकॉर्ड्स, विराट-रोहित पडले मागं

T20 World Cup: बाबर- रिझवाननं एकाच मॅचमध्ये बनवले अनेक रेकॉर्ड्स, विराट-रोहित पडले मागं

बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) ही पाकिस्तानची ओपनिंग जोडी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.

बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) ही पाकिस्तानची ओपनिंग जोडी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.

बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) ही पाकिस्तानची ओपनिंग जोडी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.

अबु धाबी, 3 नोव्हेंबर : बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) ही पाकिस्तानची ओपनिंग जोडी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांच्या फॉर्ममुळे पाकिस्ताननं सलग 4 विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. नामिबीया विरुद्ध  (Pakistan vs Namibia) मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये त्यांनी 113 रनची ओपनिंग पार्टनरशिप केली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5 शतकी पार्टनरशिप करणारी ती पहिली ओपनिंग जोडी बनली आहे. त्यांनी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या जोडीनं 4 वेळा शतकी पार्टनरशिप केली आहे.

बाबरनं टी20 इंटरनॅशनलमध्ये एकूण 14 वेळा अर्धशतक झळकावले आहेत. त्यानं विराट कोहलीला मागं टाकलं आहे. विराटनं 13 अर्धशतक झळकावली आहेत. बाबरनं टी20 इंटरनॅशनलमध्ये शतक झळकावले आहे. तर विराटला अद्याप पहिल्या शतकाची प्रतीक्षा आहे.

पाकिस्तानचा विकेटकिपर-बॅटर मोहम्मद रिझवान यानं टी20 इंटरनॅशनलमध्ये एका कॅलेंडर वर्षामध्ये 900 पेक्षा जास्त रन केले आहेत. ही कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला बॅटर बनला आहे. त्यानं 2021 मध्ये एक शतक आणि 9 अर्धशतक झळकावले आहे. तर बाबर आझमनं कॅप्टन म्हणून टी20 इंटरनॅशनलमध्ये 2400 रन पूर्ण केले. त्यानं 60 इनिंगमध्ये 48 च्या सरासरीनं 2402 रन केले आहेत. यामध्ये एक शतक आणि 23 अर्धशतकाचा समावेश आहे. त्यानं मंगळवारी शोएब मलिक (2380) आणि डेव्हिड वॉर्नर (2345) यांना मागं टाकलं आहे.

पाकिस्तानचा सलग चौथा विजय

नामिबिया विरुद्धच्या सामन्यात सामन्यात पहिले बॅटिंग करत पाकिस्तानने 2 विकेट गमावून 189 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाला 5 विकेट गमावून 144 रनच करता आले. पाकिस्तानने रेकॉर्ड पाचव्यांदा सेमी फायनलमध्ये स्थान पटकावलं आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 4-4 वेळा सेमी फायनल खेळली आहे.

IND vs AFG LIVE Streaming : भारत विरुद्ध अफगाणिस्तान लढत कधी आणि कुठे पाहता येणार

पाकिस्तानच्या टीमने 2009 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही टीम उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. याआधी पाकिस्तानने भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला धूळ चारली होती.

First published:
top videos

    Tags: Babar azam, Pakistan, T20 world cup