Home /News /pune /

पुण्यात माणूसकीशी खेळ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह 3 दिवस रुग्णवाहिकेतच पडून

पुण्यात माणूसकीशी खेळ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह 3 दिवस रुग्णवाहिकेतच पडून

कोरोनाने मृत झालेल्या माहिलेचा मृतदेह तीन दिवस हॉस्पिटलमध्येच पडून होता अशी माहिती समोर येत आहे.

पुणे, 02 ऑगस्ट : राज्यात कोरोनामुळे मोठं संकट ओढावलं आहे. अशात कोरोना खरंतर आपल्या सगळ्यांसाठी माणूसकीची परीक्षा आहे. पण पुण्यात याच माणूसकीला धक्का लागेल अशी एक घटना समोर आली आहे. कोरोनाने मृत झालेल्या माहिलेचा मृतदेह तीन दिवस हॉस्पिटलमध्येच पडून होता अशी माहिती समोर येत आहे. रिपोर्ट न मिळाल्याने अंत्यसंस्कारही करता येईना. शेवटी माजी सरपंच पैलवानांनी पुढाकार घेतला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. जिल्ह्यतील शिरुर तालुक्यात शिक्रापूरातील एका खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झालेल्या एका महिलेचा मृतदेह तब्बल 3 दिवस तसाच पडून राहिला होता. सदर महिलेच्या नातेवाईकांना हा मृतदेह ताब्यात देण्यासाठी कुणीही शासकीय यंत्रणा उपलब्ध होईना. याबाबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी कुणाही नातेवाईंचा फोन गेल्या तीन दिवसांपासून उचलत नसल्याने हा मृतदेह अक्षरश: खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना विनंती करुन आईस बॉक्समध्ये ठेवावा लागला. आणि फक्त रिपोर्ट नसल्याने तीन दिवस या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेत पडून होता. जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल यांनी माहिती शिक्रापूरचे माजी सरपंच पैलवान रामभाऊ सासवडे यांना सांगीतल्यावर सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने शनिवारी 1 ऑगस्टला रात्री उशिरा या महिलेवर अंत्यसंस्कार केले. अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा मूळची तुळजापूर इथली ही महिला आपला मुलगा व मुलीसह कारेगाव इथे रहात होती. पंधरा दिवसापासून ती आजारी होती. बुधवारी 29 जुलै रोजी रांजणगाव-गणपती इथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये या महिलेला दाखल केले होते. सदर महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आणि तिची तब्बेतही आणखी खराब होऊ लागली. यामुळे नातेवाईकांनी शासकीय यंत्रणेला कळवून सदर महिलेला शिक्रापूरातील एका खाजगी रुग्णालयात गुरुवारी 30 जुलैला दाखल केले. कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका? वैज्ञानिकांचा खुलासा मात्र, इथे तिला दाखल करताच काही वेळातच तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याबाबत संबंधित रुग्णालयाने तात्काळ तळेगाव-ढमढेरे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांना संपर्क केला पण त्या गेल्या दोन दिवसांपासून फोनच उचलत नव्हत्या. याबाबतीत संबंधित खाजगी रुग्णालयाने सांगितले की, या प्रकरणी तहसिलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आता पाठपूरावा आम्ही करणार आहोत. मात्र काहीच निर्णय घेता येईना आणि कुणीच प्रतिसाद देईनात त्यामुळे आम्ही हैरान झालो. दरम्यान डॉ. घोरपडे व डॉ. शिंदे यांना वारंवार संपर्क केला तरी दोघांनीही प्रतिसाद दिला नाही असं या खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापणाने म्हटलं आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Pune, Pune news

पुढील बातम्या