जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पुढच्या 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

पुढच्या 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. अशात 15 ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे.

राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. अशात 15 ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे.

हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्याच बरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 ऑगस्ट : बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्याच बरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडले असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद इथं 2 ऑगस्ट म्हणजेच आज तुरळक पाऊस पडेल. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. धक्कादायक! ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांवर चाकूनं सपासप वार हवामानाच्या या बदलांमुळे सुमुद्र किनारा असलेल्या भागांमध्ये मोठा प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेगही मोठा प्रमाणात असेल. यादरम्यान, समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात उतरू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा कमबॅक होणार आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी आता पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे. पण पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. मास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची सरकारने उचललं पाऊल हवामान खात्याने (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सादर केलेल्या बुलेटिनमध्ये आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IMD
  • First Published :
जाहिरात
जाहिरात