मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'बेड न मिळाल्याने माझ्या पत्नीने आत्महत्या केली', पतीच्या दाव्याने पुण्यात खळबळ

'बेड न मिळाल्याने माझ्या पत्नीने आत्महत्या केली', पतीच्या दाव्याने पुण्यात खळबळ

पुण्यातील एका कोरोनाबाधित महिलेनं आत्महत्या (Corona Positive Woman Committed Suicide)करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीनं वारजे माळवाडी परिसरातील (Warje Malwadi Area) एका रुग्णालयावर आरोप केला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

पुणे 19 एप्रिल : राज्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका कोरोनाबाधित महिलेनं आत्महत्या (Corona Positive Woman Committed Suicide)करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीनं वारजे माळवाडी परिसरातील (Warje Malwadi Area) एका रुग्णालयावर आरोप केला आहे. या महिलेला दाखल करुन घेण्यास रुग्णालयानं नकार दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावले असून उपचारानंतर या महिलेला डिस्चार्ज दिला गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या पतीनं सांगितलं, की 2 एप्रिल रोजी त्यांच्या पत्नीमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवली, मात्र लक्षणं वाढल्यानंतर तिच्या पतीनं तिला वारजे माळवाडी येथील कोविड रुग्णालयात 8 एप्रिलला दाखल केलं. मात्र, महिलेला 11एप्रिललाच डिस्चार्ज देण्यात आला. पतीच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर आणखी काही दिवस उपचार करण्याची गरज होती. मात्र, रुग्णालयानं त्यांना डिस्चार्ज दिला. त्याच रात्री महिलेला प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याचं महिलेच्या पतीनं सांगितलं.

बेड मिळाला नाही म्हणून बस स्थानकावर थांबले अन् पत्नीच्या समोरच पतीने प्राण सोडले

यानंतर पती दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेला त्या रुग्णालयात पुन्हा घेऊन गेला. महिलेचं सीटी स्कॅन (CT scan) करण्यास सांगण्यात आलं. यानंतर पती जेव्हा पुन्हा रुग्णालयात परतला तेव्हा बेड उपलब्ध नसल्याचं कारण देत महिलेला पुन्हा दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेनं ओढणीनं गळफास घेत आत्महत्या (Woman Ended Her Life by Hanging Herself) केली.

पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितलं, की आपल्या तक्रारीत या व्यक्तीनं त्याच्या पत्नीला बेड देण्यास रुग्णालयानं नकार दिल्याचा उल्लेख केला नाही. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितलं, की महिलेच्या पतीनं त्यांना उपचार नाकारले गेल्याचा किंवा त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचा उल्लेख कुठेही केला नाही.

याबाबत बोलताना वारजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं, की त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांना ऑक्सिजनची गरजही पडली नाही. डॉक्टरांनी सांगितलं, की आम्ही सीटी स्कॅनसाठीही सांगितलं नाही, कारण महिलेची ऑक्सिजन लेवल 97 हून अधिकच होती. सोबतच त्यांना काही त्रास नसल्यानं remdesivir इंजेक्शनची गरजही पडली नाही. ही महिला उपचारानंतर बरी झाली होती आणि इतर रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन द्यायचा असल्यानं त्यांना डिस्चार्ज दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Ct scan, No bed, Woman suicide