Home /News /pune /

कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह सासरच्यांनी नाकारला; माहेरच्या सरपंचामुळे गावच्या लेकीवर झाले अत्यंसंस्कार

कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह सासरच्यांनी नाकारला; माहेरच्या सरपंचामुळे गावच्या लेकीवर झाले अत्यंसंस्कार

Pune News: आंबेगाव तालुक्यातील एका कोरोनाबाधित महिलेच्या मृतदेह घेण्यास तिच्या सासरच्या मंडळींनी नकार दिला. यानंतर तिच्या माहेरच्या सरपंचानी पुढाकार घेतल्यामुळं तिच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले आहेत.

    लोणी धामणी, 05 मे: सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) झपाट्यानं वाढत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) अत्यंत घातक बनत असून यामुळे अनेक लोकांचा मृत्यू (Corona patient death) होतं आहे. अशात कोरोनामुळे निधन झाल्यानंतर सख्खी नातीही तुटायला लागली आहेत. आतापर्यंत अनेकांनी आपल्या नातेवाईकांचा मृतदेह (relative reject to take dead body) घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही कोरोबाधिताची हेळसांड होतं आहे. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली आहे. येथील कारेगावात राहाणाऱ्या एका महिलेच्या मृतदेह घेण्यास तिच्या सासरच्या मंडळींनी नकार दिला आहे. या घटनेची माहिती माहेरच्या सरपंचाला कळताचं त्यांनी तात्काळ पुढाकार घेत महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी माहेरी धामणी गावात आणला आहे. कोरोनाच्या संकटकाळात पीडित कुटुंबीयांना आधार दिल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. संबंधित 36 वर्षीय मृत महिलेचं नाव शिल्पा नवनाथ कराळे असून त्यांचं मंचर याठिकाणी कोरोनामुळं निधन झालं होतं. यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह घेण्यासाठी कारेगाव (सासर) येथील सरपंच आणि नातेवाईकांना बोलावलं होतं. हे वाचा-'ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू म्हणजे नरसंहारच',हायकोर्टाचे 48 तासांत चौकशीचे आदेश यापूर्वी आपण कधीही कोरोना बाधित रुग्णावर अंत्यसंस्कार केले नाही, असं कारण देवून मृताच्या नातेवाईकांनी आणि कारेगावच्या सरपंचांनी मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. त्याचबरोबर धामणी (माहेर) किंवा मंचर याठिकाणीच अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी विनंती केली. त्यामुळे हतबल झालेल्या शिल्पाचा भाऊ समीर करंजखेले आणि मेव्हणे संतोष ढमाले हतबल झाले होते. या घटनेची माहिती धामणीचे सरपंच सागर जाधव यांना कळताच ते मदतीला धावून आले. हे वाचा-कोरोना बाधित आईसाठी भावंडांनी गाडीत उभारला आयसोलेशन वॉर्ड त्यांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेतला आणि माहेरी अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. धामणी स्मशानभूमीत शासकीय नियामांच पालन करत सरपंच आणि कार्यकर्त्यांनी पीपीई किट परिधान करून पंधरा जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पाडले आहेत. रविवारी 25 एप्रिल रोजी मृत शिल्पा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांना गृहविलगीकरणातच राहण्याचा सल्ला दिला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मंगळवारी सायंकाळी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र बुधवारी रात्री श्वास घेण्यास अडचणी आल्यानं त्यांचं निधन झालं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona patient, Death, Pune

    पुढील बातम्या