मुंबई 25 मार्च : लॉकडाउनमुळे सगळा देशच घरात बंद झालाय. सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. घरात फक्त झोपायलाच येणारी माणसं आता सक्तिच्या सुट्टीमुळे घरातच आहेत. फक्त शनिवार आणि रविवारीच निवांत भेटू शकणाऱ्या जोडप्यांना आता चांगलाच निवांत मेळ मिळू लागला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हिच स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमालाही बहर आलाय. लोकांनी दररोज लागणाऱ्या वस्तूंचा साठा घरात करून ठेवला. आश्चर्य म्हणजे इतर गोष्टींसारखच त्यात कंडोम्सचा आणि गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर साधनांचाही समावेश आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाल्याची माहिती मेडिकल्स दुकानदारांनी दिल्याचं वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिलं आहे.
नवीन वर्षांच्या सुट्ट्या किंवा इतर काही काळात कंडोम्सची विक्री जास्त होत असते. मात्र या लॉकडाउनच्या काळात कंडोम्सच्या विक्रीत तब्बल 25 ते 30 टक्के वाढ झाल्याची माहिती काही दुकानदारांनी दिलीय. पूर्वी जे लोक एक किंवा दोन पाकिटं नेत होते त्यांनी आता 10 किंवा 20 कंडोम्स असलेली मोठी पाकिटं घेतली अशी माहितीही त्यांनी दिली.
लोकांनी जास्त प्रमाणात कंडोम्सची खरेदी केल्याने अनेक दुकानांमधला स्टॉक संपला आहे. सक्तीची सुट्टी, मोकळा वेळ, काहीसा ताण-तणाव यामुळे कपल्स या काळात जास्त जवळ येतात दररोजच्या धकाधकीच्या काळात त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. सेक्स लाईफही पाहिजे तसं उपभोगता येत नाही. त्यांना या काळाचा चांगला उपयोग करून घेता येतो असं मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.